‘या’ फ्लॉप अभिनेत्यामुळेच सलमान खान बनला सुपरस्टार; आज आहे २३२ कोटींचा मालक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 23:20 IST2017-12-24T09:22:45+5:302017-12-24T23:20:55+5:30
फोर्ब्स इंडियाकडून टॉप १०० सेलिब्रिटीजची यादी नुकतीच जाहीर केली असून, त्यामध्ये टायगर सलमान खान २३२ कोटी रुपयांच्या कमाईसह दुसºया ...

‘या’ फ्लॉप अभिनेत्यामुळेच सलमान खान बनला सुपरस्टार; आज आहे २३२ कोटींचा मालक!
फ र्ब्स इंडियाकडून टॉप १०० सेलिब्रिटीजची यादी नुकतीच जाहीर केली असून, त्यामध्ये टायगर सलमान खान २३२ कोटी रुपयांच्या कमाईसह दुसºया वर्षीही पहिल्या स्थानावर कायम आहे. सध्या सलमानकडे इंडस्ट्रीमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते. त्याच्या करिअरला खºया अर्थाने तेव्हा वळण मिळाले जेव्हा त्याचा १९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉलिवूडला सलमान खानच्या रूपात एक नवा सुपरस्टार मिळवून दिला. परंतु सलमानला ही संधी कशी मिळाली हे अजूनही बºयाचशा लोकांना माहिती नाही. होय, सलमानला सुपरस्टार बनविण्यामागे एका फ्लॉप अभिनेत्याचा हात आहे. या अभिनेत्यामुळेच सलमान आज खºया अर्थाने सुपरस्टार झाला असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात अगोदर प्रेमची भूमिका अभिनेता फराज खान याला आॅफर करण्यात आली होती. दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी प्रेमच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची स्क्रीन टेस्ट घेतली. यामध्ये विंदू दारा सिंग, दीपक तिजोरी, पीयूष मिश्रा आणि फराज खान यांच्या नावांचा समावेश आहे. अखेर प्रेमच्या भूमिकेसाठी फराज खानचे नाव निश्चित करण्यात आले होते. फराजनेदेखील या भूमिकेसाठी होकार दिला होता. त्याने चित्रपट साइनही केला होता. परंतु चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याअगोदरच तो आजारी पडला.
![]()
फराजच्या आजारपणामुळे बराच काळ शूटिंग थांबवावी लागली. अशात दिग्दर्शकांना कोणीतरी सलीम खान यांचा मुलगा सलमान खानचे नाव सुचविले. त्यावेळी सलमानही चित्रपटात काम मिळविण्यासाठी धडपड करीत होता. बडजात्या यांनी सलमानला भेटीसाठी बोलाविले. प्रेमच्या भूमिकेसाठी त्याचे आॅडिशन घेतले. त्यावेळी सलमानसोबत मोहनीश बहल यांनीही आॅडिशन दिले. अखेर बडजात्या यांनी दोघांची नावे फायनल केली.
दरम्यान, फराज खान यालादेखील अभिनयाचा वारसा लाभलेला आहे. कारण तो अभिनेता युसूफ खान यांचा मुलगा आहे. फराजने ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट रिलीज झाल्याच्या सात वर्षांनंतर ‘फरेब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पुढे फराजने ‘पृथ्वी, मेहंदी, दुल्हन बनी मैं तेरी, शिप आॅफ थीसियस’ या चित्रपटांमध्ये काम केले. यातील त्याचे बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले. २०१३ नंतर त्याचा एकही चित्रपट आला नाही. सध्या फराज लाइमलाइटपासून दूर आपले आयुष्य जगत आहे.