‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये होणार का सलमान खानची ‘एन्ट्री’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 13:18 IST2019-02-11T13:10:23+5:302019-02-11T13:18:46+5:30
सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्याबरोबर भाईजान ‘दबंग 3’च्या शूटींगला सुरूवात करणार आहे. याशिवाय भाईजानजवळ ‘किक 2’ हा चित्रपटही आहे. याशिवाय ‘नो एन्ट्री’ व ‘वॉन्टेड’ या सलमानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही चर्चा आहे.

‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये होणार का सलमान खानची ‘एन्ट्री’?
सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्याबरोबर भाईजान ‘दबंग 3’च्या शूटींगला सुरूवात करणार आहे. याशिवाय भाईजानजवळ ‘किक 2’ हा चित्रपटही आहे. याशिवाय ‘नो एन्ट्री’ व ‘वॉन्टेड’ या सलमानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही चर्चा आहे. अर्थात या सीक्वलमध्ये सलमान नसणार, अशी बातमी मध्यंतरी होती. याचे कारण म्हणजे, हे दोन्ही सीक्वल बोनी कपूर प्रोड्यूस करणार आहेत.
बोनी कपूर हे दोन सीक्वल प्रोड्यूस करणार म्हटल्यावर सलमानने म्हणे, या सीक्वलला नकार दिला. खरे तर बोनी कपूरसोबत सलमानचे कुठलेही वैर नाही. पण बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्यामुळे भाईजान नक्कीच संतापला आहे. त्यामुळे बोनी कपूरसोबत काम करण्यात म्हणे त्याला रस उरलेला नाही. आता ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलबदद्ल एक मोठा खुलासा केला. ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलची स्क्रिप्ट तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फक्त त्यांना बोनी कपूरच्या ग्रीन सिग्नलची तेवढी प्रतीक्षा आहे.
आम्ही एक शानदार स्क्रिप्ट तयार केली आहे. आता केवळ बोनी कपूर यांच्या होकाराची प्रतीक्षा आहे. मी त्यांच्याकडे माझी विशलिस्टही पाठवली आहे, असे बज्मी यांनी सांगितले. सलमान या स्क्रिप्टचा भाग असेल का? असे विचारले असता, मी खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. बोनी कपूरचं याबद्दल खरे ते सांगू शकतात, असे बज्मी म्हणाले.
‘नो एन्ट्री’मध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, लारा दत्ता, ईशा देओल व सेलिना जेटली अशी मोठी स्टारकास्ट होती. आता सीक्वलमध्ये बोनी कपूर कुणाला ‘एन्ट्री’ देतात, ते बघूच.