सलमान खान-तमन्ना भाटियाचा 'दिल दियां गल्ला'वर रोमँटिक परफॉर्मन्स, चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:56 IST2025-11-16T12:47:05+5:302025-11-16T12:56:34+5:30
दोहा येथे परफॉर्मन्सवेळी सलमान खान आणि तमन्ना भाटियाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सलमान खान-तमन्ना भाटियाचा 'दिल दियां गल्ला'वर रोमँटिक परफॉर्मन्स, चाहते म्हणाले...
अभिनेता सलमान खानच्या दबंग टूरला सुरुवात झाली आहे. कतारची राजधानी दोहा येथे ही दबंग रिलोडेड टूर आहे. सलमानसोबत तमन्ना भाटिया, जॅकलीन फर्नांडिस, सुनील ग्रोवर, मनीष पॉल, स्टेबिन बेन हे देखील या टूरवर आहेत. दोहा येथे कलाकारांचे परफॉर्मन्स आता व्हायटरल होत आहेत. विशेषत: सलमान खान आणि तमन्ना भाटियाची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. दोघांनी एकत्र सिनेमा करा असे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
दोहा येथे परफॉर्मन्सवेळी सलमान खान आणि तमन्ना भाटियाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सलमानच्या सुपरहिट गाण्यांवर सर्वांना परफॉर्म केलं. सलमानने स्वत: 'ओ ओ जाने जा ना','स्वॅग से स्वागत','दीदी तेरा देवर दीवाना','कभी तू छलिया लगती हो','जीने के है चार दिन' या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केलं. प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचत होते. जॅकलीन फर्नाडिंसनेही आपला परफॉर्मन्स दिला. दरम्यान सलमान आणि तमन्नाने 'दिल दिया गयां' या रोमँटिक गाण्यावर डान्स केला. त्यात त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खूपच खूश झाले. लाल आऊटफिटमध्ये तमन्ना एकदम हॉट दिसत आहे. तर ब्लॅक सूट बूटमध्ये सलमान खान डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. अनेकांना कतरिना कैफचीच आठवण आली.
सलमान खान आणि तमन्ना भाटियामध्ये २५ वर्षांचं अंतर आहे. सलमान तमन्नाहून २५ वर्षांनी मोठा आहे. मात्र तरी त्यांची केमिस्ट्री गोड दिसत आहे. दोघांनी अद्याप एकत्र काम केलेलं नाही. 'सलमान खान आणि तमन्ना ही बेस्ट जोडी आहे','एकत्र सिनेमा करा' अशा कमेंट्स आल्या आहेत.
सलमान खान दबंग टूरनंतर पुन्हा बिग बॉस होस्ट एपिसोड शूट करणार आहे. शिवाय तो 'बॅटल ऑफ गलवान' या आगामी सिनेमात दिसणार आहे. अपूर्व लखिया दिग्दर्शित या सिनेमात सलमान शहीद कर्नल बी संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे.