विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 16:22 IST2019-04-26T11:26:58+5:302019-04-26T16:22:39+5:30

विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे.

Salman Khan and Shah Rukh Khan's Bhangra Paa Le to be remixed for Sunny Kaushal's film | विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!

विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!

ठळक मुद्दे यापूर्वी सनी कौशल अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मध्ये दिसला. आता ‘भंगडा पा ले’या चित्रपटात सनी लीड रोल साकारताना दिसणार आहे.

विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणा-या सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल एक खास खबर आहे. होय, सनीच्या या चित्रपटात एक जुने सुपरहिट गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. हे गाणे कोणते, हे तुम्ही ओळखले असेल. होय, शाहरूख खान व सलमान खानच्या ‘करण अर्जुन’मधील ‘भंगडा पा ले’ हेच ते गाणे. ‘करण अर्जुन’चे हे गाणे योगायोगाने चित्रपटाच्या टायटलला मॅच करणारे आहे. त्यामुळे या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


‘भंगडा पा ले’ या चित्रपटात सनी कौशलच्या अपोझिट तेलगू अभिनेत्री रूखसार ढिल्लोची वर्णी लागली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर पंजाबात भंगडा कसा लोकप्रिय झाला, याची ही सुरस कथा आहे. दिग्दर्शक रमेश तुरानींची मुलगी स्नेहा तुरानी हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. स्नेहा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवतेय. येत्या १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतेय. ‘भंगडा पा ले’ या चित्रपटामध्ये सनी डीजे जग्गी सिंगची भूमिका साकारणार आहे. तर रूखसार ही सिमी कोहलीच्या भूमिकेत दिसणार आहे.


विकी कौशलसाठी २०१९ हे वर्ष अतिशय शानदार राहिले. त्याच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली. आता सनीचा चित्रपट काय कमाल दाखवतो, ते बघूच.

Web Title: Salman Khan and Shah Rukh Khan's Bhangra Paa Le to be remixed for Sunny Kaushal's film