असा टळला सलमान खान-रणबीर कपूरच्या चित्रपटामधला क्लैश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 17:15 IST2017-07-08T11:27:56+5:302017-07-08T17:15:33+5:30

बॉक्स ऑफिसवर सलमान खान आणि रणबीर कपूरमध्ये या क्रिसमसला संघर्ष पाहायला मिळाला असता मात्र तो आता टळला आहे. 2017च्या ...

Salman Khan and Ranbir Kapoor clash in the film! | असा टळला सलमान खान-रणबीर कपूरच्या चित्रपटामधला क्लैश !

असा टळला सलमान खान-रणबीर कपूरच्या चित्रपटामधला क्लैश !

क्स ऑफिसवर सलमान खान आणि रणबीर कपूरमध्ये या क्रिसमसला संघर्ष पाहायला मिळाला असता मात्र तो आता टळला आहे. 2017च्या ख्रिसमसला सलमान खान आणि कॅटरिना कैफचा टायगर अभी जिंदा है प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी रणबीर कपूरचा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. मात्र रणबीरच्या चित्रपटाची रिलीजडेट 2018च्या मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
 
राजकुमार हिरानी यांचा संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट क्रिसमसच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार होता. या सिनेमात संजुबाबाची भूमिका रणबीर कपूर साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठा त्याने फार मेहनसुद्धा घेतली आहे. हिरानी यांच्या चित्रपटाचे डिस्टीब्यूटर आणि एक्जीबीटर यांनी दोन्ही चित्रपटांमध्ये क्लैशेस होऊ नये म्हणून संजय दत्तच्या बायोपिकेची रिलीजडेट पुढे ढकलली आहे. या चित्रपटाचा आशय अतिशय चांगला आहे. चांगला आशय असतानाही हा चित्रपट जर सलमानच्या चित्रपटासोबत रिलीज झाला तर त्याचा फटका रणबीरच्या चित्रपटालाच बसले. तसेच जिथे सलमान खानचा चित्रपट 200 कोटींचा बिझनेस करेल तिथे रणबीरचा दमदार अभिनय असतानाही 150 कोटींचा टप्पा गाठू शकेल. आता हा चित्रपट 30 मार्च 2018ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरचा मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. ज्याप्रकारे त्यांने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे ते बघता पुढच्या वर्षीच्या सर्व पुरस्कांवर रणबीरने आपले नावं कोरले ते आश्चर्य वाटायला नको. या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. 

Web Title: Salman Khan and Ranbir Kapoor clash in the film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.