सलमान खान म्हणतोय, ... आणि माझ्या आयुष्यात आली मॅडम सर... पाहा भारतचे नवे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:38 PM2019-04-17T15:38:38+5:302019-04-17T15:39:42+5:30

सलमानचा हा लुक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर आता सलमानने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर लाँच केले आहे.

Salman Khan and katrina Kaif starrer Bharat movie new poster launched | सलमान खान म्हणतोय, ... आणि माझ्या आयुष्यात आली मॅडम सर... पाहा भारतचे नवे पोस्टर

सलमान खान म्हणतोय, ... आणि माझ्या आयुष्यात आली मॅडम सर... पाहा भारतचे नवे पोस्टर

googlenewsNext
ठळक मुद्देया पोस्टरमध्ये सलमानसोबतच आपल्याला या चित्रपटाची नायिका कतरिना कैफला पाहायला मिळत आहे. तरुण वयातील सलमान या पोस्टरमध्ये दिसत असून कॅटरिना कॅज्युएल लुकमध्ये दिसत आहे. 

सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटातील स्वत:चा लूक शेअर केला आहे. सलमान खान या चित्रपटात वेगवेगळ्या सहा अवतारात दिसणार आहे. यामुळे साहजिकच त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खान एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता. पांढरे केस, पांढरी दाढी असा त्याचा या पोस्टरवरील लूक होता. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है,’ असा हा लूक शेअर करताना सलमानने लिहिले होते. 

सलमानचा हा लुक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर आता सलमानने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये सलमानसोबतच आपल्याला या चित्रपटाची नायिका कतरिना कैफला पाहायला मिळत आहे. तरुण वयातील सलमान या पोस्टरमध्ये दिसत असून कॅटरिना कॅज्युएल लुकमध्ये दिसत आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा सलमानच्या भारत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारतच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे,अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. येत्या २४ तारखेला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या तारखेविषयी कतरिना कैफने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने उत्तर भारताच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. हे लोकेशन्स निवडण्यासाठी ‘भारत’च्या टीमने अख्खा उत्तर भारत पालथा घातला होता. या चित्रपटात भाईजान सलमान खानसोबत कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे या चित्रपटाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.

Web Title: Salman Khan and katrina Kaif starrer Bharat movie new poster launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.