सलमान खानच्या या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं सौरव गांगुलीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 17:31 IST2019-07-08T17:30:18+5:302019-07-08T17:31:03+5:30

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Salman Khan actress Nagma and Sourav Ganguly controversial love life | सलमान खानच्या या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं सौरव गांगुलीचं नाव

सलमान खानच्या या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं सौरव गांगुलीचं नाव

भारतीय क्रिकेटला नवीन दिशा दाखवणारे माजी कर्णधार सौरव गांगुली आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. गांगुली यांना भारताच्या चांगल्या कर्णधारापैकी एक मानलं जातं. असं बोललं जातं की या क्रिकेटरमध्ये अशी गोष्ट होती की ते माणसाला पाहून त्याचा स्वभाव ओळखायचे.


गांगुली यांचं करियर जितकं चर्चेत होतं. तेवढंच त्यांचं नात वादात अडकलं होतं. क्रिकेटच्या पटांगणात सामन्या दरम्यान आपलं शर्ट काढून हवेत फिरवणे, ग्रेग चॅपेल यांना भारतीय संघाचा कोच नेमणं, रवी शास्त्री यांना तक्राप व नगमाशी प्रेम.

गांगुली एकेकाळी खूप चर्चेत आला होता. त्यावेळी असे वृत्त आले होते की २००० साली गांगुली यांचं सलमान खानसोबत बागी चित्रपटात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नगमाला डेट करत होते. नगमा यांच्या नावामुळे खूप वाद झाले होते. कारण त्यावेळी गांगुली विवाहित होते. त्यावेळी त्या दोघांनी कधी खुलून बोलले नाही. मात्र मागील वर्षी २०१८ साली नगमा यांनी या प्रकरणावर चुप्पी तोडली. 


एका मुलाखतीत नगमाने या गोष्टीचा स्वीकार केला की गांगुली आणि ती रिलेशनशीपमध्ये होते. ती म्हणाली की, आम्ही एकमेकांना खूप पसंत करत होतो. आम्ही कधी प्रसारमाध्यमांसमोर ही गोष्ट कबूल केली नव्हती. मात्र ते खरे होते.त्यावेळी त्यांच्या करियरसाठी चांगला काळ होता आणि ते भारतीय संघाचे कर्णधार होते. मात्र २००० साली गांगुली यांचे करियर टॉपवर होते त्यावेळी चाहते भारतीय संघाचा पराजय व कर्णधाराचा वाईट परफॉर्मन्स सहन करू शकत नव्हते.
तिने पुढे सांगितलं की, याचा आमच्या नात्यावर परिणाम पडत होता. त्यावेळी गांगुलींना करियरवर फोकस करायचे होते. त्यावेळी कोणाला तरी वेगळं व्हायचं होते ना. माझ्या हिशोबानं तो काळ गांगुली यांचे वेगळे होण्याचा निर्णय अगदी योग्य होता. त्यावेळी मी चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून खूप हैराण झाली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या सहमतीनं वेगळे झाले होतो. आजही आम्ही एकमेकांना आदर देतो.

Web Title: Salman Khan actress Nagma and Sourav Ganguly controversial love life