​ सलमानने विमानतळावर घातला गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 15:59 IST2016-07-18T10:29:49+5:302016-07-18T15:59:49+5:30

‘रेप्ड वूमन’वादाची शाई वाळते ना वाळते तोच सलमान खान याने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे. मुंबई विमानतळावर ...

Salman got confused at the airport! | ​ सलमानने विमानतळावर घातला गोंधळ!

​ सलमानने विमानतळावर घातला गोंधळ!

ेप्ड वूमन’वादाची शाई वाळते ना वाळते तोच सलमान खान याने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे. मुंबई विमानतळावर विमान कर्मचाºयांशी सलमानची बाचाबाची झाल्याची खबर आहे. सलमान विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीला निघाला होता. याचवेळी ही घटना घडली. सलमान विमानतळावर पंधरा मिनिटे उशीरा पोहोचला.विमान उड्डाण भरण्याच्या तयारीत होते आणि त्यास थांबवणे शक्य नव्हते. मात्र याऊपरही सलमानने विमानतळावरील अधिकाºयांवर विमान थांबवण्यास दबाव टाकला. सर्वप्रकारे समजावूनही सलमान काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मग काय, ‘दबंग’ सलमानने विमान कंपनीच्या अधिकाºयांना धमकीच देऊन टाकली. मला या विमानाने जावू दिले नाही तर मी यानंतर कधीही या कंपनीच्या विमानाने प्रवास करणार नाही, अशी धमकी त्याने दिली. हा गोंधळ बराच वेळ चालला. या गोंधळानंतर अखेर सलमानला ऐनकेनप्रकारे समजावून गेस्टरूममध्ये नेण्यात आले आणि  नंतर एअर इंडियाच्या पुढच्या विमानाने त्याला दिल्लीला रवाना करण्यात आले.

विमानतळ कर्मचाºयांशी हुज्जत घालतानाचा सलमानचा फोटो :

Web Title: Salman got confused at the airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.