सलमान, अरबाज, सोहेलबद्दल मलाइका अरोराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 18:52 IST2017-03-13T13:22:14+5:302017-03-13T18:52:14+5:30

सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि मलाइका अरोरा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत होत्या. ...

Salman, Arbaaz, Malika Arora gave such a response to Sohail! | सलमान, अरबाज, सोहेलबद्दल मलाइका अरोराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

सलमान, अरबाज, सोहेलबद्दल मलाइका अरोराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

परस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि मलाइका अरोरा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे दोघांनी या प्रकरणाला बगल देताना, आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दाखवून देत चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा एकदा खान बंधूंमुळे मलाइका चर्चेत आली आहे. तिने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये तिघे भाऊ सहभागी झाल्यावरून वक्तव्य केल्याने मलाइका विरुद्ध खान बंधू असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 



त्याचे झाले असे की, गेल्या काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोच्या एका एपिसोडमध्ये सलमान खान, अरबाज आणि सोहेलने हजेरी लावली होती. त्यामुळे या एपिसोडची प्रेक्षकांना जबरदस्त आतुरता लागली होती. या एपिसोडमध्ये तिन्ही भावांनी प्रेम, लग्न आणि सेक्स या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या या दिलखुलासपणावर केवळ फॅन्स नव्हे तर इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटीही फिदा झाले होते. त्यात मलाइकाचेही नाव आहे. तिला हा शो एवढा पसंत आला होता की, यावर प्रतिक्रिया दिल्यावाचून तिला राहावले नाही. मात्र तिची प्रतिक्रिया खोचक असल्याने खान बंधू यास काय उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरेल. 

त्याचे झाले असे की, नुकतेच ‘कॉफी विथ करण जोहर’ या शोला खान बंधूंवर आधारित असलेला एपिसोडला बेस्ट एपिसोडचे नामांकन मिळाले. त्यासाठी मलाइका अरोरा, नेहा धूपिया आणि अयान मुखर्जी यांचे जज पॅनल होते. यादरम्यान मलाइकाने या एपिसोडविषयी वक्तव्य करताना म्हटले होते की, या सिजनमधील ‘सलमान, सोहेल, अरबाजवर चित्रित करण्यात आलेला एपिसोड खरोखरच बेस्ट होता. कारण या एपिसोडमध्ये तिन्ही भावांनी प्रामाणिक अन् खरी उत्तरे दिली होती. ते जसे आहेत, अगदी तसेच ते शोमध्ये बघावयास मिळाले. मलाइकाच्या या कमेण्टनंतर इतरांनीही काहीशा अशाच प्रतिक्रिया दिल्या. 



वास्तविक मलाइकाने दिलेली ही प्रतिक्रिया खोचक नसून, तिने पती अरबाजसह जेठ आणि दीराचे केलेले कौतुक होते. त्यामुळे मलाइका आणि अरबाजमधील संबंध पूर्णत:च संपुष्टात आले असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण तिच्या या वक्तव्यामुळे अजूनही काही बिघडले नाही, असेच प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात मलाइका आणि अरबाज एकत्र दिसल्यास नवल वाटू नये. 

Web Title: Salman, Arbaaz, Malika Arora gave such a response to Sohail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.