Excited? रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार प्रभास अन् सलमान खानची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 10:50 IST2017-06-13T05:20:46+5:302017-06-13T10:50:46+5:30
‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभास हा देशातील सगळ्यांत लोकप्रीय स्टार बनलाय, असे म्हटले तर यात काहीही अतिशयोक्ती नाही. केवळ साऊथचेच नाही ...

Excited? रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार प्रभास अन् सलमान खानची जोडी!
‘ ाहुबली’ सीरिजनंतर प्रभास हा देशातील सगळ्यांत लोकप्रीय स्टार बनलाय, असे म्हटले तर यात काहीही अतिशयोक्ती नाही. केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूडमधील बडे बडे दिग्दर्शक प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. करण जोहरच्या चित्रपटातून प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी आपण अलीकडे वाचली असेलच. अर्थात अद्याप करण किंवा प्रभास यापैकी कुणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण आता यापेक्षा एक धमाकेदार बातमी आमच्या कानावर आली आहे. होय, प्रभास हा बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानसोबत बॉलिवूड डेब्यू करणार, अशी ही बातमी आहे.
सूत्रांचे खरे मानाल तर, रोहित शेट्टीला प्रभासला घेऊन चित्रपट काढायचा आहे. केवळ इतकेच नाही तर ‘बाहुबली2’च्या तोडीचा ब्लॉकबस्टर अॅक्शनपट रोहित शेट्टीला तयार करायचा आहे. या चित्रपटात प्रभाससोबत सलमान खानला कास्ट करण्याचा रोहितचा विचार आहे. आता रोहितचा हा विचार सत्यात उतरला तर प्रभास व सलमानची जोडी काय धमाका करेल, याची केवळ कल्पना करा.
ALSO READ : नील नितीन मुकेशने सुरू केली ‘साहो’ची शूटिंग; आता प्रभासच्या एंट्रीची प्रतीक्षा!
तूर्तास प्रभास व सलमानने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. पण त्यांच्या होकारापर्यंत रोहित शेट्टी प्रतीक्षा करणार आहे. सध्या प्रभास ‘साहो’ या त्याच्या आगामी चित्रपटात बिझी आहे. नुकतेच त्याने या चित्रपटाचे शूटींग सुरु केलेय. याऊलट सलमानकडेही अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. लवकरच त्याचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. याशिवाय ‘टायगर जिंदा है’मध्ये तो सध्या व्यस्त आहे. यानंतर ‘दबंग3’ आणि रेमो डिसूजाचा एक चित्रपट तो करणार आहे.