कबीर रंगवणार सलमान अन् चिनी मुलीची कथा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 09:57 IST2016-05-24T04:26:21+5:302016-05-24T09:57:54+5:30

 सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते खरंच खुप धम्माल करतात. बॉक्स आॅफिसचे सर्व ...

Salman and Chinese girl's story to paint Kabir? | कबीर रंगवणार सलमान अन् चिनी मुलीची कथा ?

कबीर रंगवणार सलमान अन् चिनी मुलीची कथा ?

 
ुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते खरंच खुप धम्माल करतात. बॉक्स आॅफिसचे सर्व रेकॉडर््स तोडून सर्वांना केवळ सल्लूमियाँ स्वत:चे नाव घेण्यास भाग पाडतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक था टायगर’ आणि ‘ बजरंगी भाईजान’ हे आहेत.

सलमान आणि कबीर हे चांगले मित्र असून एकमेकांच्या कुटुंबासोबत ते फिरायलाही जात असतात. असे म्हटले जातेय की, आता पुन्हा हे दोघे एकत्र येणार आहेत. त्यांच्यासोबत दीपिका पदुकोन ही देखील दिसणार असल्याची चर्चा होती. पण ती केवळ अफवा असल्याचे कळाले. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे.

यात कुठलीच अभिनेत्री नसून केवळ सलमानची भूमिका, त्याचा भाऊ आणि चीनमधील एक लहान मुलगी असणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरले नसून कथा सलमानच्या भूमिकेभोवती फिरणारी आहे. याचे शूटिंग लडाख, काश्मिर, अजमेर येथे करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Web Title: Salman and Chinese girl's story to paint Kabir?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.