सलमान-अनुष्का बुडापेस्टमध्ये...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 11:26 IST2016-06-02T05:56:18+5:302016-06-02T11:26:18+5:30
‘सुल्तान’ चित्रपटाच्या ट्रेलरने सलमान-अनुष्काच्या सर्व चाहत्यांचे मन जिंकून घेतले. ते दोघे बुडापेस्टमध्ये चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटिंग करण्यासाठी गेले ...

सलमान-अनुष्का बुडापेस्टमध्ये...!
सुल्तान’ चित्रपटाच्या ट्रेलरने सलमान-अनुष्काच्या सर्व चाहत्यांचे मन जिंकून घेतले. ते दोघे बुडापेस्टमध्ये चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटिंग करण्यासाठी गेले आहेत. ६ जूनपर्यंत ते तिथेच राहणार आहेत. चित्रपटाच्या कथानकानुसार बुडापेस्ट हे योग्य शहर असल्याचे सांगण्यात आले होते.
सलमान आणि अनुष्का यांनी सुल्तान मध्ये पहलवानांच्या भूमिका केल्या आहेत. अनुष्का पंजाबला परतणार असून तिच्या आगामी चित्रपट ‘फिल्लोरी’ च्या शूटिंगला सुरूवात करावयाची आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपट ईदला ६ जुलै रोजी रिलीज होणार आहे.