सलीम खान यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरुन काढणार? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:46 IST2026-02-19T08:43:39+5:302026-02-19T08:46:00+5:30
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सलीम खान यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरुन काढणार? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, सलीम खान यांची प्रकृती आता 'स्थिर' असून उद्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.
डॉक्टर काय म्हणतात?
सलीम खान ९० वर्षांचे असून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पार्कर यांनी सांगितले की, "सलीम खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना अजूनही निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे." याशिवाय कुटुंबाच्या विनंती केल्याने रुग्णालय प्रशासनाने यापुढे कोणतेही अधिकृत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, मुलगी अलविरा आणि जावई आयुष शर्मा यांच्यासह संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित आहे. सलमान खानने त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गालवान' या चित्रपटाचे चित्रीकरण आणि इतर सर्व व्यावसायिक कामे सध्या बाजूला ठेवली असून तो आपल्या वडिलांसोबत आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी रुग्णालयात धाव घेतली. चित्रपट निर्माते रमेश तौरानी, रितेश देशमुख, जावेद अख्तर आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दिग्दर्शक सुभाष घई भावुक होत म्हणाले की, "सलीम साहेब हे माझ्यासाठी भावासारखे आहेत, संपूर्ण इंडस्ट्री त्यांचा आदर करते आणि ते लवकर बरे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे.