'या' चित्रपटासाठी सलीम-सुलेमानने घेतले फक्त 10 पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:47 IST2017-03-06T09:02:39+5:302017-03-15T12:47:56+5:30

 25 मे 2014मध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. पूर्णाचा जन्म 10 जून 2000 मध्ये तेलंगाणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील पकल या ...

Saleem-Suleman took only 10 paisa for the film 'This' | 'या' चित्रपटासाठी सलीम-सुलेमानने घेतले फक्त 10 पैसे

'या' चित्रपटासाठी सलीम-सुलेमानने घेतले फक्त 10 पैसे

 25
मे 2014मध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. पूर्णाचा जन्म 10 जून 2000 मध्ये तेलंगाणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील पकल या गावी झाला. 

याचित्रपटासह अभिनेता राहुल बोस चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण करतोय. राहुल बोस पूर्णा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. याचित्रपटाचे संगीत नुकतेच सलीम यांच्या वाढदिवशी उस्ताद जाकीर हुसैन यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक राहुल बोस यांने चित्रपटाशी संबंधीत अनेक खुलासे केले. या चित्रपटाचा बजेट खूपच कमी होता. त्यामुळे राहुल बोस हा अनेक वेळा सलीम-सुलेमानकडून या चित्रपटाचे संगीत कोणाकडून करुन घेवू असा प्रश्न विचारत होता. यानंतर सलीमने राहुला नक्की प्रोब्लेम काय आहे असे विचारले यावर राहुल आपण एका चित्रपट तयार करतोय याच संगीत तुम्ही द्याव अशी माझी इच्छा आहे मात्र तुम्हाला देण्यासाठी माझा खिशात फक्त 10 पैसे आहेत. यावर सलीमने क्षणाचा ही विलंब न लावता राहुल बोसला होकार दिला. सलीमला या चित्रपटाची कथा खूप आवडली असल्याचे त्यांने सांगितले. याचित्रपटातील पूर्णा ची भूमिका तेलंगणाची आदिती इनामदार ही मुलगी साकारत आहे. पूर्णाला एव्हरेस्ट सर करण्यासाठी 52 दिवस लागले. 31 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. राहुल बोस याचित्रपटाला घेऊन खूपच उत्साहित दिसला. 

Web Title: Saleem-Suleman took only 10 paisa for the film 'This'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.