अमिताभ यांना क्षणभरही एकटं सोडत नाही ‘ही’ व्यक्ति; पगार इतका की आकडा ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:55 IST2021-08-26T15:54:02+5:302021-08-26T15:55:24+5:30

बिग बी घराबाहेर पडताच, एक व्यक्ति क्षणात अ‍ॅक्टिव्ह होते. तिचे नाव जितेन्द्र शिंदे.

Salary of Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde | अमिताभ यांना क्षणभरही एकटं सोडत नाही ‘ही’ व्यक्ति; पगार इतका की आकडा ऐकून थक्क व्हाल

अमिताभ यांना क्षणभरही एकटं सोडत नाही ‘ही’ व्यक्ति; पगार इतका की आकडा ऐकून थक्क व्हाल

ठळक मुद्देअमिताभ यांच्या सुरक्षेचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेणा-या या बॉडीगार्डचा महिन्याचा पगार अर्थातच लाखांत आहे.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते भल्या पहाटेपासून त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी करतात. केवळ बंगल्याबाहेरचं नाही तर बिग बी जिथे कुठे जातील, तिथे चाहत्यांचा गराडा पडतो. त्यामुळे बिग बी घराबाहेर पडताच, एक व्यक्ति क्षणात अ‍ॅक्टिव्ह होते. तिचे नाव जितेन्द्र शिंदे. होय, जितेंद्र शिंदे कोण तर अमिताभ यांचा बॉडीगार्ड. गेल्या अनेक वर्षांपासून तो अमिताभ यांच्या सुरक्षेत तैनात आहे. अगदी सावलीसारखा तो अमिताभ यांच्यासोबत असतो. 

देशात असो किंवा देशाबाहेर जितेंद्र सतत अमिताभ यांच्या पाठीशी दिसतो. शूटींगच्या ठिकाणीही तो दिसतोच दिसतो. मग अगदी केबीसीचा सेट असो किंवा एखाद्या सिनेमांचे शूटींग अमिताभ यांच्यासोबत जितेन्द्र हजर असतो. जितेन्द्र अमिताभ यांचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. हातात कार्बाइन गन घेतलेल्या या बॉडीगार्डला तुम्ही अमिताभ यांच्या अनेक फोटोत बघितले असेलच.

अमिताभ यांच्या सुरक्षेचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेणा-या या बॉडीगार्डचा महिन्याचा पगार अर्थातच लाखांत आहे. अमिताभ त्याला वर्षाला दीड कोटी रूपये पगार देतात. आश्चर्य वाटेल पण आपल्या देशातील अनेक खासगी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारापेक्षा या बॉडीगार्डचा पगार जास्त आहे.
 जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची सिक्युरिटी एजंसी आहे. मात्र जितेंद्र स्वत: अमिताभ यांच्या सेवेत तैनात आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला तेव्हा याच जितेंद्र शिंदे यांनी त्याला सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिग बी यांच्याच सांगण्यावरून. त्यांच्याच सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची चर्चा होती.

Web Title: Salary of Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.