"ज्या शहरावर प्रेम केलं, तिथली हवाच आता विषारी झालीय" मुंबईच्या प्रदूषणावर सैयामी खेरची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:03 IST2026-02-25T15:59:25+5:302026-02-25T16:03:48+5:30

सैयामी खेरनं मास्क घातलेला फोटो शेअर करत मुंबईतील मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर भाष्य केलंय.

Saiyami Kher Mumbai Air Pollution Post Running Mask Photo Share Haiwan Actress | "ज्या शहरावर प्रेम केलं, तिथली हवाच आता विषारी झालीय" मुंबईच्या प्रदूषणावर सैयामी खेरची पोस्ट

"ज्या शहरावर प्रेम केलं, तिथली हवाच आता विषारी झालीय" मुंबईच्या प्रदूषणावर सैयामी खेरची पोस्ट

Saiyami Kher on Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच हैराण झाले आहेत. अशातच  अभिनेत्री सैयामी खेर हिने मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर भाष्य केलंय. तिनं सोशल मीडियावर मास्क घातलेला फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहली आहे.

लवकरच अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या 'हैवान' चित्रपटात दिसणारी सैयामी एक उत्तम धावपटू आहे. मंगळवारी तिने सोशल मीडियावर मास्क घातलेला एक सेल्फी शेअर करत लिहिले, "मी दशकापूर्वी धावायला सुरुवात केली होती. दररोज सकाळी मुंबईतील कार्टर रोडवर समुद्राच्या थंड वाऱ्यात धावताना मला या शहराच्या आणि धावण्याच्या प्रेमात पाडलं होतं. मला तो जुना आनंद पुन्हा अनुभवायचा आहे, पण परिस्थिती बदलली आहे. आता धावण्यापूर्वी मला मास्क घालावा लागतो".

एअर प्युरिफायर आणि बंद खिडक्या
सैयामीने स्पष्ट केले की, मास्क घातल्यामुळे तिला पुन्हा एकदा कोरोनाच्या भीषण काळ आठवतो. फरक एवढाच की आता हवेत विषाणू नसले, तरी ही हवा तितकीच विषारी आणि हानिकारक झाली आहे. तिने पुढे लिहिले, "मी कधीच कल्पना केली नव्हती की श्वास घेण्याइतकी मूलभूत गोष्ट इतकी मौल्यवान आणि दुर्मिळ होईल. आता मला माझ्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. माझं धावणं आता समुद्राकडे बघत नसतं, तर घराच्या भिंतींकडे बघत असतं. एअर प्युरिफायरचा वापर करून श्वास घेण्याची वेळ आली आहे".

सैयामीसाठी धावणे हा केवळ व्यायाम नसून तिचे मन शांत करण्याचे एक साधन आहे. ती म्हणाली, "धावणं हीच माझी ओळख आहे. ते माझं मन शांत करतं. माझ्यातल्या अशा जखमा भरून काढतं, ज्या इतर कशानेही भरून येत नाहीत". मात्र, सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना ती म्हणते, "ही केवळ हंगामी समस्या राहिलेली नाही. राजकारण करण्याची ही गोष्ट नाही. डेटा दर्शवतो की हवा खराब आहे, तरीही काही लोक ते नाकारतात. माझ्यासारखे अनेक लोक त्या जुन्या सकाळच्या धावण्याला मुकले आहेत. हवा स्वच्छ ठेवण्याची छोटी जबाबदारी मागणे हे देखील खूप मोठे झाले आहे का?".

Web Title : मुंबई की जहरीली हवा: सैयामी खेर ने प्रदूषित शहर पर जताया दुख।

Web Summary : सैयामी खेर ने मुंबई की बिगड़ती वायु गुणवत्ता पर चिंता जताई। उन्होंने खुले में दौड़ने और एयर प्यूरीफायर की आवश्यकता पर प्रकाश डाला। वह प्रदूषण पर कार्रवाई करने का आग्रह करती हैं, कहती हैं कि यह मौसमी और राजनीतिक बहस से परे है।

Web Title : Mumbai's toxic air: Saiyami Kher laments polluted city she loves.

Web Summary : Saiyami Kher highlights Mumbai's worsening air quality, sharing her concerns about outdoor running and the need for air purifiers. She misses running freely and urges action on pollution, emphasizing it's beyond seasonal and political debate.