'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी सांगितली त्यांच्या मैत्रीची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:35 IST2025-12-19T18:34:31+5:302025-12-19T18:35:08+5:30
अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) त्यांच्या 'सैयारा' (Saiyaara) या पदार्पणाच्या चित्रपटामुळे लोकप्रिय झाले आहेत. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची प्रचंड प्रशंसा झाली, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले. मात्र, अहानने स्पष्ट केले आहे की अनीत त्याची चांगली मैत्रीण आहे आणि तो सध्या सिंगल आहे.

'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी सांगितली त्यांच्या मैत्रीची गोष्ट
अहान पांडे आणि अनीत पड्डा त्यांच्या 'सैयारा' (Saiyaara) या पदार्पणाच्या चित्रपटामुळे लोकप्रिय झाले आहेत. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची प्रचंड प्रशंसा झाली, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले. मात्र, अहानने स्पष्ट केले आहे की अनीत त्याची चांगली मैत्रीण आहे आणि तो सध्या सिंगल आहे. हे दोघेही एकमेकांचे कौतुक करत असले, तरी भविष्यात ते वेगवेगळ्या प्रोजेक्ट काम करणार आहेत. अहान स्वतः म्हणतो, ''जेव्हा दोन लोक खरोखरच चांगले मित्र बनतात, तेव्हा ऑन‑स्क्रीन केमिस्ट्री प्लॅन करण्याची गरजच नसते… जे काही होतं, ते सहज आणि नैसर्गिकपणे होतं.''
अनीत त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत सांगते की, ''मी जेव्हा अहानला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच मला जाणवलं की या व्यक्तीसोबत मी खूप कम्फर्टेबल राहणार आहे. त्याच्यात काहीतरी खूपच मनमोकळं होतं.'' ती पुढे म्हणाली की,''जेव्हा मी पहिल्यांदा मोहित सूरी आणि अहानला एकत्र भेटली, तेव्हा खूप नर्व्हस होती. मी थोडी गोंधळत होते, माझे विनोद चालत नव्हते, आणि तो बिचारा तरीही हसत होता. पण त्या भेटीने काहीतरी खास सुरू झालं. त्याने गिटार वाजवला, आम्ही गाणी गायली, तो मला घरी सोडायला आला तेव्हा कारमध्ये खूप गप्पा मारल्या आणि तेव्हाच मला वाटलं की हा माणूस खूपच छान आहे, त्याची एनर्जी खूप आवडली.''
अनीत पुढे म्हणाली, ''शूटच्या आधीच्या काही महिन्यांत आम्ही खूप चांगले मित्र झालो, खूप भेटलो, आमच्या शंका‑कुशंका, भीती शेअर केल्या… त्यामुळे सेटवर गेले तेव्हा मला खूप सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटलं, कारण आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे होतो.'' अहान आणि अनीतच्या अप्रतिम केमिस्ट्रीवर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी सैयाराचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्सवर पाहायला मिळणार आहे.