सैफच्या वडिलांच्या बायोपिकमध्ये रणबीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 10:31 IST2016-11-16T10:30:11+5:302016-11-16T10:31:09+5:30

आता हे काय नवीन? आहो पण हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द सैफची आई लेजेंडरी अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर म्हणाताहेत. नुकतेच ...

Saif's father's biopic Ranbir? | सैफच्या वडिलांच्या बायोपिकमध्ये रणबीर?

सैफच्या वडिलांच्या बायोपिकमध्ये रणबीर?

ा हे काय नवीन? आहो पण हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द सैफची आई लेजेंडरी अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर म्हणाताहेत. नुकतेच एका कार्यक्रमात त्यांनी पती मन्सुर अली खान पतौडी यांच्या जीवनावर चित्रपट बनला तर नक्कीच आनंद होईल अशी प्रतिक्रिया दिली.

दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शर्मिला म्हणाल्या की, ‘मन्सुर अली खान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवन्यास काहीच हरकत नाही. एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाने संशोधन करून जर पटकथा तयार केली तर का नाही! मन्सुरच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या चित्रपटात दाखवल्या जाऊ शकतात. त्यांचा अपघात, वडिलांचा मृत्यू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी रुपेरी पडद्यावर पाहण्यास मला खूप आवडेल.’

पण त्यांची भूमिका कोण करू शकतो असे विचारल्यावर मात्र त्यांनी सर्वांना चकित करणारे उत्तर दिले. ‘त्यांच्याशी दिसण्यात साम्य असणारा अभिनेता असावा. कदाचित रणबीर कपूर त्यांच्या भूमिकेत चपखल बसेल. नाही तर घरातील कोणी त्यांची भुमिका साकारू शकते.’ 


क्रिकेटचा नवाब : मन्सुर अली खान पतौडी
                                
मग शर्मिलाचा रोल कोण करणार? यावर त्या म्हणतात, ‘ते सांगणे कठीण आहे. कदाचित आलिया भट्ट?’ सैफ अली खानचे वडिल मन्सूर अली क्रिकेट खेळाडू होते. टीममध्ये इतर अनुभवी प्लेयर्स असतानाही त्यांना वयाच्या केवळ २१व्या वर्षी कर्णधारपद देण्यात आले होते. त्यांच्या कारकीर्दीमध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये प्रथमच टेस्ट मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता.

                                    
                                                          द नवाबी कपल : मन्सुर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर

त्यांना ‘टायगर पतौडी’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्याविषयी एक पुस्तक प्रकाशित झाले असून बायोग्राफीसुद्धा लिहिली जात आहे. संजय दत्तच्या बायोपिक नंतर रणबीर पुन्हा एका बायोपिकमध्ये दिसणार का याचे उत्तर तर लवकरच कळेल. 

Web Title: Saif's father's biopic Ranbir?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.