प्रभाससोबत दिसणार सैफ, त्याआधी पत्नी करिना कपूरसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 14:39 IST2021-01-11T14:33:00+5:302021-01-11T14:39:58+5:30
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.

प्रभाससोबत दिसणार सैफ, त्याआधी पत्नी करिना कपूरसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आजकाल आपल्या आगामी सिनेमांना घेऊन चर्चेत आहे. 15 जानेवारीला त्याची वेबसिरीज 'तांडव' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ज्याचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. त्याचबरोबर सैफच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. आता बातमी समोर येत आहे की,सिनेमाचे शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू होईल पण मार्च महिन्यानंतरच सैफ शूटिंग ज्वॉईन करेल.
सैफची पत्नी करीना कपूर खान लवकरच तिच्या दुसर्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सैफ पॅटरनिटी लीव्हवर आहे. सैफ आपला सर्व वेळ पत्नी आणि कुटुंबासमवेत घालवतो आहे.
सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले की, सिनेमाची शूटिंग जानेवारीत सुरू होईल आणि प्रभास त्याच्या शुटिंगला सुरुवात करेल. त्याचबरोबर मार्चनंतर सैफ अली खान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेणार आहे. या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे.
आदिपुरूष' थ्रीडी हिंदी आणि तेलुगू भाषेत शूट केली जाईल तर तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही इंटरनॅशनल भाषेत डब केला जाईल. २०२२ मध्ये सिनेमा रिलीज करण्याचं प्लॅनिंग आहे.