सैफ करणार ‘केरळ ते अमृतसर ’ प्रवास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 13:37 IST2016-09-23T08:07:48+5:302016-09-23T13:37:48+5:30

सैफ अली खान लवकरच बाबा होणार आहे. पत्नी करिना कपूर खान ही डिसेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. तसेच ...

Saif to travel from 'Kerala to Amritsar'! | सैफ करणार ‘केरळ ते अमृतसर ’ प्रवास !

सैफ करणार ‘केरळ ते अमृतसर ’ प्रवास !

फ अली खान लवकरच बाबा होणार आहे. पत्नी करिना कपूर खान ही डिसेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. तसेच सैफचा ‘रंगून’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होईल. त्याचे शूटींग संपले असून पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस काम सुरू आहे. त्यामुळे सैफ सध्या खुप खुश आहे.

‘जॉन फेव्हरोज शेफ’ चा हिंदी रिमेक ‘एअरलिफ्ट’ दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन काढणार आहे. त्यात सैफला मुख्य भूमिकेत घेण्यात येणार असून चित्रपटाची शूटींग आॅक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याचे कळते आहे.

सुत्रांकडून कळते की,‘ चित्रपटासाठी सैफ बरीच मेहनत घेतोय. दररोज तो ८ तास काम करतो आहे. करिनालाही तो पास्ता बनवून खाण्यासाठी आग्रह करतो आहे. पुढील महिन्यापासून त्याला गोवा, अमृतसर, दिल्ली आणि परदेशातही फिरावे लागेल. चित्रपटाचे पहिले शेड्यूल हे केरळात सुरू होणार आहे.’ 

Web Title: Saif to travel from 'Kerala to Amritsar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.