लग्नानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत किसिंग सीन द्यायला घाबरत नाहीत सैफ आणि करीना, अभिनेत्रीनेच सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:01 IST2021-05-03T13:01:03+5:302021-05-03T13:01:41+5:30
अभिनेत्री करीना कपूर नेहमी आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. तिन सैफ अली खानसोबतच्या रिलेशनशीपबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

लग्नानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत किसिंग सीन द्यायला घाबरत नाहीत सैफ आणि करीना, अभिनेत्रीनेच सांगितले कारण
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमी आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. तिन सैफ अली खानसोबतच्या रिलेशनशीपबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत तिला विचारले होते की, सैफसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी ऑन स्क्रीन पॉलिसी ठरवली नाही का कारण सैफ लग्नानंतर काही सिनेमात इतर अभिनेत्रींसोबत किसिंग सीन करताना दिसला होता.
करीना कपूरने या प्रश्नांचे उत्तर बेधडकपणे देताना सांगितले होते की, आम्ही ऑफस्क्रीन नो किसिंग पॉलिसी स्वीकारली आहे. सैफ ऑन स्क्रीन कोणालाही किस करू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण ज्यापद्धतीने चित्रपट बनत आहेत, ते आमच्या कामाचा हिस्सा आहे.
करीनाने पुढे याबद्दल सांगितले की, मी की अँड कामध्ये अर्जुन कपूरसोबत किसिंग सीन दिले होते कारण हा चित्रपट पती पत्नीच्या नात्यावर होता आणि मी किसिंग सीन करायला नकार देणे योग्य ठरले नसते. करीना म्हणाली की, लग्नानंतर मी आणि सैफ सिनेमात नो किसिंग पॉलिसीचा अवलंब करणार होतो पण साराने आमचा विचार बदलायला लावला.
सारा अली खानने करीना आणि सैफला म्हटले होते की, अशी पॉलिसी फॉलो करणे व्यर्थ निर्णय ठरेल कारण हल्ली प्रेक्षक याबद्दल इतका विचार करत नाही. तुम्ही दोघे किसिंग सीन्सला घेऊन नॉर्मल रहा काही होणार नाही. आम्हाला साराची गोष्ट आवडली आणि आम्ही ती फॉलो केली.
सैफ आणि करीनाने २०१२ साली साध्या पद्धतीने रजिस्टर्ड मॅरिज केले होते. सैफचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अमृता सिंगसोबत लग्न केले होते जे फक्त १३ वर्ष टिकले. २००३ मध्ये दोघे वेगळे झाले. घटस्फोटोनंतर अमृता सिंगला सारा अली खान आणि इब्राहिमची कस्टडी मिळाली.