सैफअली खानचं रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:49 IST2016-01-16T01:11:40+5:302016-02-06T07:49:27+5:30

फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांच्यासाठी अभिनेता सैफअली खान याने रॅम्प वॉक केले आहे. एका विशेष दिवसाच्या आयोजनानिमित्त झालेल्या फॅशन ...

Saif Ali Khan's Rumpwalk | सैफअली खानचं रॅम्पवॉक

सैफअली खानचं रॅम्पवॉक

शन डिझायनर राघवेंद्र राठोड यांच्यासाठी अभिनेता सैफअली खान याने रॅम्प वॉक केले आहे. एका विशेष दिवसाच्या आयोजनानिमित्त झालेल्या फॅशन शोमध्ये सैफ सहभागी झाला होता. जीक्यू फॅशन नाईटस् या उच्चभ्रूंच्या फॅशन शोमध्ये सैफ अली खान नेहरू ज्ॉकेट परिधान करून सहभागी झाला होता.त्यामुळे तोच या वेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राघवेंद्र यांनी सादर केलेले कलेक्शन प्रभावी आणि उच्च दर्जाचे ठरले. ब्लॅक अँड व्हाईटच्या थीमवर त्याने हा पेहराव केला होता. प्रेरणादायी कलेक्शनबद्दल सांगताना राठोड म्हणाले की, सैफ अली खान आणि आपल्या फॅशनची एक चांगली केमिस्ट्री अनेक वर्षांपासून जुळून आली आहे.त्यामुळे या डिझाईनसाठी सैफअली खान योग्य आहे. त्याने स्वत:चा असा एक बँ्रन्ड निर्माण केला आहे. राघवेंद्र राठोड हा देखील एक प्रेरणादायी ब्रँड ठरला आहे. ब्रिटिश राजबाबत सैफअली खानपेक्षा अधिक चांगली व्यक्ती असूच शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Saif Ali Khan's Rumpwalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.