कुणाला डेट करतेय सैफ अली खानची मुलगी सारा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:37 IST2017-05-17T12:14:06+5:302018-04-03T14:37:40+5:30

टीव्ही निर्माता विकास गुप्ताने सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हे फोटो सोशल ...

Saif Ali Khan's daughter Sara? | कुणाला डेट करतेय सैफ अली खानची मुलगी सारा ?

कुणाला डेट करतेय सैफ अली खानची मुलगी सारा ?

व्ही निर्माता विकास गुप्ताने सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यानंतर विकास गुप्ताने हे फोटो इन्स्टाग्रामवरुन काढून टाकले. या फोटोत पहिल्यांदा साराला बिकनीत दिसली आहे.विकास गुप्ताने या फोटोला कॅप्शन दिले आहे, एका हॉटेलमध्ये मी माझ्या विकेंड एन्जॉय करतोय. तिथे माझी जुनी मैत्रिणी सारा मला भेटली. आम्ही इथे खूप चांगला वेळ एकमेंकाबरोबर सपेंट केला असे कॅप्शन त्यांने दिले होते.   



मीडियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून साराच्या बॉलिवूडमधील डेब्यूची चर्चा आहे. स्टुडंट ऑफ द इअरच्या सिक्वलमध्ये सारा दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिटला टायगर श्रॉफ दिसणार असल्याचे समजते आहे. स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट 2012 साली करण जोहरच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये तीन नव्या स्टार्सची एंट्री झाली होती. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांनी याच चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पादार्पण केले होते.  याचित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. सारा ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची कन्या आहे. बॉलिवूड स्टार किड्सच्या लिस्टमध्ये साराचे नाव नेहमीचवर असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूड एंट्री विषयी बोलले जातेय. मात्र याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सारा अनेकवेळा पार्टीच्या ठिकाणी स्पॉट झाली आहे.  

 

Web Title: Saif Ali Khan's daughter Sara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.