मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान दिसणार रोमान्स करताना, किसिंग सीन चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:00 IST2025-04-19T12:59:40+5:302025-04-19T13:00:10+5:30
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटात मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान दिसणार रोमान्स करताना, किसिंग सीन चर्चेत
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटात मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमातील त्यांचा किसिंग सीनही चर्चेत आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे निकिता दत्ता (Nikita Dutta). सैफ अली खान आणि निकिता दत्ता 'ज्वेल थीफ: द हेस्ट बिगिन्स' सिनेमात दिसणार आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
निकिता दत्ता आणि सैफ अली खान यांच्या 'ज्वेल थीफ: द हेस्ट बिगिन्स' या चित्रपटातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सैफ अली खान त्याच्या ऑनस्क्रीन हिरोईनसोबत किसिंग सीन करताना दिसत आहे. निकिता दत्ताने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. निकिताने २०१९ मध्ये आलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटातही काम केले होते. ती घरत गणपती या मराठी सिनेमातही झळकली आहे. आता निकिता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. निकिता दत्ताचा हा चित्रपट आता २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निकिता फक्त ३४ वर्षांची आहे आणि टीव्ही जगात प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. आता निकिता चित्रपट जगतातील मोठ्या नायिकांच्या यादीत सामील झाली आहे.
सैफ अली खान ५४ वर्षांचा झाला असला तरी त्याचे स्टारडम अजूनही कमी झालेले नाही. अनेकदा चाहते सैफला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. 'ज्वेल थीफ: द हेइस्ट बिगिन्स' या दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल आणि कोकी गुलाटी यांनी केले आहे. यासोबतच चित्रपटाची कथा सिद्धार्थ आनंद, सुमित अरोरा आणि डेव्हिड लोगन यांनी लिहिली आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि निकिता दत्ता यांच्यासोबत जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.