धर्माच्या भिंती ओलांडून केलं लग्न, दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर; अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफला वाटत होती 'या' गोष्टीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:01 IST2026-02-09T13:58:48+5:302026-02-09T14:01:45+5:30
अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफला सतावत होती'या'गोष्टीची चिंता, म्हणालेला...

धर्माच्या भिंती ओलांडून केलं लग्न, दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर; अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफला वाटत होती 'या' गोष्टीची भीती
Saif Ali Khan And Amrita Singh: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ( Saif Ali Khan) त्याच्या अभिनयासह पतौडी घराण्यातील छोटा नवाब म्हणून ओळखला जातो. पतौडी घराण्यातील तो दहावा नवाब आहे. त्याचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. १९९३ मध्ये आलेल्या यश चोप्राच्या 'परंपरा' या चित्रपटातून सैफ अली खानने चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.'परिणीता'त्यानंतर लगेचच आलेल्या 'सलाम-नमस्ते', 'ना तूम जानो ना हम', 'डरना मना है', 'कल हो ना हो', 'एलओसी कारगिल', 'एक हसीना थी' या चित्रपटांनी सैफ अली खानचे नाव प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अग्रक्रमावर पोहचले. मात्र, सैफ अली खान हा त्याच्या करिअरमध्ये चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला.
वैयक्तिक जीवनात १९९२ ला आपल्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी सैफने लग्न केले. या दाम्पत्याला इब्राहिम आणि सारा अली खान ही दोन अपत्ये झालीत. मात्र, २००४ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. सध्या सैफची एका जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायल होते आहे.अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता प्रचंड टेन्शनमध्ये आला होता.त्याला एका गोष्टीची चिंता सतावत होती. नेमकं काय घडलेलं?
दरम्यान, अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याला मुलांना भेटता येत नव्हतं. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याचा खुलासा केला होता.त्यावेळी मुले आपल्या विरोधात जातील का? आपलं मूळ काय आहे, हे ते कधीच विसरता कामा नये ती इस्लामपासून दूर जाऊ नये. अशी भीती त्याला
वाटायची.
काय होती अभिनेत्याची इच्छा...
घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी ही अमृता सिंहकडे होती. त्यामुळे मुलांवर अमृता आणि तिच्या कुटुंबियांच्या सानिध्यात राहत होती. याबद्दल सैफ म्हणालेला, " तेव्हा मला वाटत होतं की,माझ्या दोन्ही मुलांना पतौडी कुटुंब,नवाबी शिष्टाचार आणि इस्लामिक परंपरेबद्दल त्यांना माहिती असावी, ते आपल्या मुळाशी जुळलेले असावेत." इतकंच नाहीतर सारा आणि इब्राहिमला फक्त इस्लाम धर्माबद्दल माहिती घ्यावी असं नाही. तर, त्यांनी सर्व गोष्टी शिकायला हव्यात आणि प्रत्येक जाती-धर्माचा सन्मान करायला पाहिजे. असं देखील सैफ म्हणाला होता.