Vikram Vedhaमधील Saif Ali Khan चा फर्स्ट लूक आऊट, Kareena Kapoor म्हणाली– पती नेहमीपेक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:27 IST2022-02-24T15:20:58+5:302022-02-24T15:27:14+5:30
'विक्रम वेधा' या चित्रपटातील हृतिक रोशननंतर सैफ अली खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Vikram Vedhaमधील Saif Ali Khan चा फर्स्ट लूक आऊट, Kareena Kapoor म्हणाली– पती नेहमीपेक्षा...
'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातील हृतिक रोशननंतर सैफ अली खान(Saif ali khan)चा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लूक पाहून चाहते इम्प्रेस झालेत. त्याच्या फर्स्ट लूकमध्ये सैफ रफ अँड टफ अवतारात दिसतो आहे. या लूकवरून सैफ दमदार स्टाईलमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सैफ अली खानचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. फोटोमध्ये सैफ अली खानने पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. त्याच्या हातात घड्याळ आणि डोळ्यावर चष्मा आहे. सैफ सॉल्ट अँड पेपर बियर्डसोबत इंटेंस लूकमध्ये दिसत आहे. सैफ अली खानची पत्नी करिना कपूर खान (kareena kapoor)देखील त्याचा हा लूक खूप आवडला आहे. सैफचा फोटो शेअर करत करिनाने लिहिले की, 'पती नेहमीपेक्षा जास्त हॉट दिसत आहे. मी या चित्रपट पाहण्याची आणखी वाट पाहू शकत नाही.
सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्या विक्रम या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले. तो म्हणाला होता, 'विक्रम हा एक अतिशय मजबूत, यशस्वी आणि हुशार आयपीएस अधिकारी आहे. तो खूप डायनामिक आहे. विक्रमचा लूक पाहिल्यानंतर सैफ अली खान अगदी बरोबर होता असे म्हणता येईल.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांनी 'विक्रम वेधा'पूर्वी ना तुम जानो ना हम या चित्रपटात एकत्र काम केले होते. विक्रम वेधबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन यात गँगस्टरच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे, सैफ एक पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफच्या आधी वेदाच्या भूमिकेतील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक त्याच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आला होता. याला चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळाली होती.
विक्रम वेधा हा आर माधवन आणि विजय सेतुपती यांची भूमिका असलेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. पुष्कर-गायत्री या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारी जोडी. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.