'या' तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:23 IST2022-05-16T18:21:54+5:302022-05-16T18:23:03+5:30

Saif ali khan: सैफने त्याच्यापेक्षा १० वर्ष लहान असलेल्या करीना कपूरसोबत लग्न केलं. मात्र, हे लग्न करताना सैफने प्रचंड विचार केला होता.

saif ali khan took divorced from amrita singh and wedded with kareena kapoor know reason | 'या' तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह

'या' तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) बऱ्याचदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. यात खासकरुन त्याची लवलाइफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. सैफने अभिनेत्री अमृता सिंहसोबत (Amrita Singh) पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी लग्नाला १३ वर्ष झाल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा १० वर्ष लहान असलेल्या करीना कपूरसोबत (kareena kapoor) लग्न केलं. मात्र, हे लग्न करताना सैफने प्रचंड विचार केला होता. यात खासकरुन त्याने तीन गोष्टी लक्षात घेतल्या मग लग्नाचा विचार केला.

सैफने त्याच्यापेक्षा १२ वर्ष मोठ्या असलेल्या अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी सैफ २० वर्षांचा होता. तर, अमृता ३२ वर्षांची. परंतु, वयातील अंतरामुळे या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर सैफने करीनासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे एका मुलाखतीत सैफने करीनासोबत लग्न करण्यामागील कारण सांगितलं.

" प्रत्येक मुलाने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीसोबतच लग्न केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण,  सुंदर, नॉन जजमेंटल, आणि फन लविंग असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करणं खूप फायद्याचं ठरतं. हे सगळे गुण करीनामध्ये होते. त्यामुळेच मी तिच्याशी लग्न केलं", असं सैफ म्हणाला.

दरम्यान, सैफ आणि करीनाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तिच्या पहिल्या बाळाला तैमुरला जन्म दिला. आणि, २०२१ मध्ये जहांगीर या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आजच्या घडीला करीना आणि सैफ हे कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जातात.

Web Title: saif ali khan took divorced from amrita singh and wedded with kareena kapoor know reason