सैफचा मुलगा इब्राहिम अली खानला लॉन्च करणार करण जोहर, या सिनेमातून करणार डेब्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:57 PM2022-05-30T16:57:12+5:302022-05-30T16:57:24+5:30

Ibrahim Ali Khan : आता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानचा भाऊ  इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. 

Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan is all set to make his Bollywood debut | सैफचा मुलगा इब्राहिम अली खानला लॉन्च करणार करण जोहर, या सिनेमातून करणार डेब्यू!

सैफचा मुलगा इब्राहिम अली खानला लॉन्च करणार करण जोहर, या सिनेमातून करणार डेब्यू!

googlenewsNext

Ibrahim Ali Khan :  बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स सध्या करिअर मार्गी लागण्याची वाट बघत आहेत तर काही काहींच्या करिअरला यशस्वी सुरूवातही झाली आहे. आता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानचा भाऊ  इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. 

सर्वात खास बाब म्हणजे बॉलिवूडमध्ये इम्राहिम अली खानच्या धमाकेदार एन्ट्रीची जबाबदारी करण जोहरच्या खांद्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार, करण जोहर हाच इब्राहिम अली खानला इतर स्टारकिड्सप्रमाणे लॉन्च करणार आहे. इब्राहिम साऊथचा सुपरहिट सिनेमा 'हृदयम' च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, करण जोहर लीडिंग प्रॉडक्शन हाऊससोबत हात मिळून इब्राहिम अली खानला लॉन्च करण्याचं प्लानिंग करत आहेत. या सिनेमाचं नाव 'हृदयम' असंच असणार. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्नुसार, इब्राहिम अली खानसाठी करण जोहर परफेक्ट लॉन्चची वाट बघत आहे. करण वाटतं की, इब्राहिम या भूमिकेत फिट बसेल, यात एक विद्यार्थी ते एक मच्योर पुरूष बनण्याचा प्रवास आहे. 

इब्राहिमच्या डेब्यूबाबत अशीही चर्चाच आहे की, त्याच्या अपोझिट श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसू शकते. पण याबाबत काहीच ऑफिशिअल सांगण्यात आलेलं नाही. दुसरीकडे काही दिवसांपासून इब्राहिम पलक तिवारीसोबत रिलेशनशिपवरूनही चर्चेत आहे. दोघेही काही ठिकाणी एकत्र दिसले होते. तेव्हापासून ही चर्चा सुरू आहे.
 

Web Title: Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan is all set to make his Bollywood debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.