सैफ अली खान सांगतोय, सारा अली खान झळकणार करण जोहरच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 11:28 IST2017-02-20T05:58:52+5:302017-02-20T11:28:52+5:30
सैफ अली खानची कन्या सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून मीडियामध्ये येत आहेत. पण ...
.jpg)
सैफ अली खान सांगतोय, सारा अली खान झळकणार करण जोहरच्या चित्रपटात
ref="http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/sara-ali-khan-to-debut-with-shah-rukh-khans-son-aryan-khan/15253">सैफ अली खानची कन्या सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून मीडियामध्ये येत आहेत. पण या बातमीला सैफ अली खान अथवा साराची आई अभिनेत्री अमृता सिंगने कधीही दुजोरा दिला नव्हता. पण आता सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे स्वतः सैफ अली खानने म्हटले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या चित्रपटाद्वारे सारा बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावणार असल्याचे तो सांगतो.
सैफ अली खान गेल्या 25-30 वर्षं चित्रपटांमध्ये काम करत असून त्याची पूर्वपत्नी अमृता सिंगनेदेखील ऐंशीच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आला त्यांची मुलगी सारा बॉलिवूडमध्ये येणार आहे. याविषयी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सैफ सांगतो, "सारा नेहमीच तिच्या मनाने सांगितलेल्याच गोष्टी ऐकते. ती जे काही करत आहे, त्याच्यासाठी मी खूप आनंदीत आहे. आम्ही सतत चित्रपटांबाबत बोलत असतो. तसेच मी तिला चित्रपटांबद्दल मार्गदर्शनदेखील करत असतो. पण शेवटी निर्णय काय घ्यायचा हा तिने तिचा ठरवायचा आहे. ती करण जोहरसोबत तिचा पहिला चित्रपट करत आहे आणि तिच्या या निर्णयासाठी आम्ही खूप खूश आहोत. कारण करण हा एक खूप चांगला निर्माता आणि दिग्दर्शक असून त्याने आतापर्यंत अनेक नवीन चेहरे इंडस्ट्रीला दिले आहेत. नवोदितांसोबत काम कसे करायचे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे तो तिला खूप चांगल्याप्रकारे लाँच करणार याची मला खात्री आहे. त्याला चित्रपटांची चांगली जाणीव आहे. त्यामुळे तो साराला लाँच करत असल्याचा मला आनंद होत आहे.
![saif ali khan daughter]()