Saifina Wedding Anniversary: लग्न करण्यापूर्वी करिना कपूरने सैफ अली खानसमोर ठेवली होती ही अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 14:53 IST2018-10-16T14:51:37+5:302018-10-16T14:53:38+5:30
करिना आणि सैफचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करिनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा मान्य नव्हता. हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती.

Saifina Wedding Anniversary: लग्न करण्यापूर्वी करिना कपूरने सैफ अली खानसमोर ठेवली होती ही अट
करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील एक हॉट कपल मानले जाते. या दोघांच्या लग्नाला आज सहा वर्षं पूर्ण झाली आहेत. पाच वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी लग्न केले होते. करिनाचे हे पहिले लग्न आहे तर बॉलिवूडचा छोटे नवाब सैफ अली खान याचे करिनाच्या आधी अमृता सिंहसोबत लग्न झाले होते.
करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. त्याचवेळी करिनाच्या आयुष्यात सैफची एंट्री झाली आणि दोघे प्रेमात पडले. दोघांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाली. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर 'टशन' सिनेमाच्या सेटवर सैफ करिना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली. टशन सिनेमात सैफ, करिनासह अक्षय कुमारसुद्धा होता. त्यावेळी सैफचा स्वभाव करिनाला भावला. महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्यावर लट्टू झाली. वयाने सैफ करिनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. पण वयाचा अडसर त्यांच्या प्रेमात आला नाही. केवळ लग्नाaअगोदर करिनाने सैफसमोर एक अट ठेवली होती. सैफ नवाबच्या घराण्यातून होता. सैफशी लग्न करून करिना बेगम बनणार होती. त्यामुळे पैशाची तिला काही कमी नव्हती. मात्र लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये काम करत राहणार अशी अट तिने सैफपुढे ठेवली. सैफने याला लगेचच होकार दिला आणि दोघे रेशीमगाठीत अडकले.
करिना आणि सैफचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करिनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा मान्य नव्हता. हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती. पण लग्न धुमधडाक्यात करण्याचे दोन्ही कुटुंबीयांनी ठरवलं तर पळून जाऊन लग्न करण्याचा इशारा सैफिनाने दिला होता. दोघांच्या या धमकीनंतर दोघांचं लग्न साधेपणाने संपन्न झाले. दोघांनी कोर्टात लग्न केले आणि काही मोजक्या मंडळींनाच लग्नाचे निमंत्रण देण्यात आलं होतं. करिना आणि सैफ यांना तैमूर हा मुलगा असून ती आजही बॉलिवूडमध्ये काम करते आहे. यात तिला सैफचा पूर्णपणे पाठिंबा मिळतोय.