​करिना ‘रंगून’ पाहायला जातेय म्हटल्यावर सैफ अली खानला बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 15:54 IST2017-02-20T10:24:28+5:302017-02-20T15:54:28+5:30

करिना कपूर समान्यत: कुठल्याही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जात नाही. पण ‘रंगून’च्या स्पेशल स्क्रिनिंगला जायचे तिने ठरवले आणि तिचा हबी सैफ ...

Saif Ali Khan gets hit after saying 'Kareena' is going to see 'Rangoon'! | ​करिना ‘रंगून’ पाहायला जातेय म्हटल्यावर सैफ अली खानला बसला धक्का!

​करिना ‘रंगून’ पाहायला जातेय म्हटल्यावर सैफ अली खानला बसला धक्का!

िना कपूर समान्यत: कुठल्याही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जात नाही. पण ‘रंगून’च्या स्पेशल स्क्रिनिंगला जायचे तिने ठरवले आणि तिचा हबी सैफ अली खान याच्या भूवया उंचावल्या. आता या चित्रपटात खुद्द सैफ अली खान आहे आणि त्याने यात कंगना राणौतसोबत अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहेत. आता यामुळे सैफ मनातून दचकला असेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर असे काहीही नाही. (करिनाच्या या स्पेशल स्क्रिनिंगला शाहिद कपूरशीही जोडू नका.) खरे सांगायचे तर करिना ‘रंगून’ पाहायला गेली त्यामागे सैफचे कंगनासोबतचे सीन्स वा शाहिद हे कारण नाही तर विशाल भारद्वाज हे खरे कारण आहे.



काल रविवारी करिनाने ‘रंगून’ पाहिला.  ‘रंगून’ पाहिल्यानंतर पत्रकारांनी करिनाला अनेक प्रश्न विचारले. यावेळी तिने सैफसोबत झालेला तिचा संवादही शेअर केला. मी ‘रंगून’ पाहायला जातेय, असे मी सैफला सांगितले, तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. मी ‘रंगून’ पाहायला जातेय, हे त्याच्यासाठी कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते.



आता यात ‘धक्का’ बसण्यामागचे कारण काय तर करिना कधीच स्पेशल स्क्रिनिंगमध्ये जावून चित्रपट बघत नाही. त्यामुळे करिना ‘रंगून’ पाहायला जातेय म्हटल्यावर सैफला धक्का बसला. करिनाच्या मते, ‘रंगून’ पाहायला जाण्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे, विशाल भारद्वाज या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. दुसरे यात सैफही होता. करिना याबद्दल सांगते, मी विशालसोबत ‘आेंकारा’ केलेला आहे. यात माझ्यासोबत सैफही होता. हा सैफच्या काही आयकोनिक रोलपैकी एक होता. त्यामुळे ‘रंगून’ पाहणे माझ्यासाठी एक भावनिक क्षण होता.

ALSO READ : ​‘रंगून’मध्ये सैफ अली खानने असा रंगविला रुसी बिल्मोरिया
प्रेग्नेंसीनंतर करिना कपूर करणार टीव्ही डेब्यू?

आता ‘रंगून’ कसा वाटला? हा प्रश्न तर करिनाला विचारला जाणार होता. ‘रंगून’ पाहून करिनाच इतकी उत्सूक होती की हा चित्रपट ‘फिल्म आॅफ दी इयर’ ठरणार, असे ती म्हणाली. म्हणजे, तसे तिने अगदी जाहिरच करून टाकले.

Web Title: Saif Ali Khan gets hit after saying 'Kareena' is going to see 'Rangoon'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.