तैमुरच्या बाहुल्यावर डॅडी सैफ अली खान आणि मम्मी करिना कपूरने दिली ही रिअॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:49 IST2018-11-21T12:29:18+5:302018-11-21T12:49:24+5:30

नुकताच सैफ अली खान चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये आला होता. त्यावेळी सैफने सांगितले की तैमुरच्या पॉप्युलारिटी कोणत्या स्टार्सपेक्षा कमी नाही आहे.

Saif-ali-khan and kareen kapoor reaction on taimur dol | तैमुरच्या बाहुल्यावर डॅडी सैफ अली खान आणि मम्मी करिना कपूरने दिली ही रिअॅक्शन

तैमुरच्या बाहुल्यावर डॅडी सैफ अली खान आणि मम्मी करिना कपूरने दिली ही रिअॅक्शन

ठळक मुद्देतैमुर जन्मल्यापासून सर्व प्रसार माध्यमांची हेडलाईन बनला आहे.       तैमुरने पॉप्युलारिटीच्या बाबतीत सैफ आणि करिना कपूर खानला देखील मागे टाकले आहे

नुकताच सैफ अली खान चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये आला होता. त्यावेळी सैफने सांगितले की तैमुरच्या पॉप्युलारिटी कोणत्या स्टार्सपेक्षा कमी नाही आहे. नुकताच तैमुरचा बाहुलादेखील बाजारात आला आहे. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकल्या जात असल्याचेसमोर आले आहे. आता इतर लहान मुलंसुद्धा तैमुरसोबत खेळू शकतात. 

तैमुरने पॉप्युलारिटीच्या बाबतीत सैफ आणि करिना कपूर खानला देखील मागे टाकले आहे. तैमुर जन्मल्यापासून सर्व प्रसार माध्यमांची हेडलाईन बनला आहे.       

तैमूरच्या बाहुल्यावर सैफ अली खानने विनोद अंदाजात रिअॅक्शन दिलंय. सैफने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ''तैमुरचे नाव आता ट्रेडमार्क ठेवायला हवं. कमीत कमी मला त्याच्या फॅन्सना एक बाहुला पाठवला पाहिजे. मला आनंद आहे लोकांना त्याचापासून फायदा होतोय. मला फक्त तैमुरची सुरक्षा आणि आनंद हवा आहे.'' 

करिना कपूर म्हणाली, तैमुरवर लोकांचे खूप प्रेम आहे म्हणून त्यांना कधीच फोटो काढण्यापासून किंवा बाहुला तयार करण्यातपर्यंत कोणाला थांबवणे चुकीचे आहे. मात्र लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की तैमुर दोन वर्षांचा लहान मुलगा आहे त्याला इतर मुलांप्रमाणे साधारण आयुष्य हवं आहे. मी आणि सैफ या गोष्टीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतो मात्र आम्ही कधीच मीडियाला तैमुरचे फोटो काढण्यासाठी थांबवले नाही. मीडियाचे कॅमेरे तैमुरला घरातून बाहेर घेरतात तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही.      

Web Title: Saif-ali-khan and kareen kapoor reaction on taimur dol