सई ताम्हणकरच्या 'भक्षक'चा ट्रेलर रिलीज; डॅशिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:59 AM2024-01-31T11:59:22+5:302024-01-31T12:02:31+5:30

'भक्षक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Sai Tamhankar and Bhumi Pednekar's Bhakshak is releasing on Netflix and trailer is finally out | सई ताम्हणकरच्या 'भक्षक'चा ट्रेलर रिलीज; डॅशिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत!

सई ताम्हणकरच्या 'भक्षक'चा ट्रेलर रिलीज; डॅशिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत!

अभिनेत्री सई ताम्हणकरनं वर्ष २०२४ ची दमदार ओपनिंग केली आहे. तिच्या 'भक्षक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर असून सई पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.  'भक्षक'हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

 नेटफ्लिक्सच्या युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या २ मिनिटे ३८ सेंकदाच्या या ट्रेलरमध्ये दमदार संवाद ऐकायला येत आहेत. सिनेमात भूमी महिला पत्रकाराच्या भूमिकेत असून ती अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिनं वैशाली सिंगची भूमिका साकारली आहे.  शेल्टर होमच्या नावाखाली मुलींवर होणारे जघन्य गुन्हे या सिनेमातून उलगडणार आहेत. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

सई ताम्हणकरनं फक्त मराठी फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सईने यापूर्वी 'हंटर', 'मीमी' आणि 'इंडिया लॉकडाऊन' या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता त्यानंतर अभिनेत्री या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मराठीतहीत तिचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  या दोन्ही सिनेमातून  सई पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकेल यामध्ये शंका नाही.
 

Web Title: Sai Tamhankar and Bhumi Pednekar's Bhakshak is releasing on Netflix and trailer is finally out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.