स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 08:59 IST2025-09-23T08:59:07+5:302025-09-23T08:59:34+5:30
साई पल्लवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर

स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
हिंदी सिनेसृष्टीत पुढील वर्षी धमाका होणार आहे. नितेश तिवारींचा ४००० कोटी बजेटचा 'रामायण' सिनेमा येणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. श्रीरामाची भूमिका असल्याने रणबीर कपूरने वर्षभरापूर्वीच नॉनव्हेज खाणं, धूम्रपान या सवयी सोडल्या. तर दुसरीकडे आता साई पल्लवी नुकतीच व्हेकेशनला गेली असून तिथे तिने स्वीमसूट घातल्याने तिच्यावर टीका होत आहे. माता सीतेच्या भूमिकेतली अभिनेत्री असे कपडे कसे घालू शकते अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
साई पल्लवी तिची बहीण पूजासोबत व्हेकेशनवर गेली आहे. दोघी बहिणी बीचवर एन्जॉय करत आहेत. साई पल्लवीची बहीण अगदी तिच्यासारखीच दिसते. तिने पूजाचे बरेच कँडीड फोटो काढले आहेत. तर काही फोटोत साई पल्लवीही स्वत: दिसत आहे. यात तिने बिकिनी घातली आहे. 'बीच हाय, सनकिस्ड' असं कॅप्शन पूजाने दिलं आहे.
या फोटोंवर नेटकऱ्यांनी मात्र टीका केली आहे. 'पडद्यावर पारंपरिक, साधी भोळी दिसणारी साई पल्लवी खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते', 'अशा प्रकारे साईव पल्लवीनेही ती सो कॉल्ड हिरोईन असल्याचं सिद्ध केलं' अशा कमेंट्स आल्या आहेत. तर साई पल्लवीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 'स्वीमिंग करताना किंवा बीचवर तिने साडी नेसायला हवी का?' अशा कमेंट्स केल्या आहेत.
साई पल्लवीने गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेले नाही. याआधीही ती भारतीय सैनिकांवर केलेल्या एका टिप्पणीवरुन वादात अडकली होती.