'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब
By तेजल गावडे | Updated: November 6, 2020 16:45 IST2020-11-06T16:43:02+5:302020-11-06T16:45:09+5:30
साहिलला बॉलिवूडमध्ये स्टाइल चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. पण आता तो बॉलिवूडमधून गायब आहे.

'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब
बॉलिवूड अभिनेता साहिल खानने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. दमदार पर्सनॅलिटी असूनही त्याला चित्रपटात हवे तसे काम मिळाले नाही. साहिलला बॉलिवूडमध्ये स्टाइल चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. पण आता तो बॉलिवूडमधून गायब आहे.
साहिल खानने आपल्या करियरची सुरूवात २००१ साली स्टाइल सिनेमातून केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत शर्मन जोशी होता. या चित्रपटातील शर्मन जोशी आणि साहिल खानची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटानंतर शर्मन जोशीला बॉलिवूडमधील कारकीर्दीला चालना मिळाली. मात्र साहिलची हळू हळू फ्लॉप स्टारच्या यादीत गिणती होऊ लागली.
साहिल खानने आपल्या करियरमध्ये स्टाइल शिवाय एक्सक्यूज मी, ये है जिंदगी, डबल क्लास आणि अलादिन शिवाय एकूण सात सिनेमात काम केले आहे. मात्र ढोबळ कथेमुळे त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत आणि फ्लॉप ठरले. बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरला तरी साहिल खान कोट्याधीश आहे आणि रॉयल लाइफ जगतो.
बॉलिवूडपासून दुरावल्यानंतर साहिल खानने स्वतःची जिम ओपन केली आहे. या बिझनेसमुळे त्याला खूप फायदा झाला आहे. त्यानंतर त्याने त्याच्या जिमचे बरेच ब्रांच सुरू केल्या. इतकेच नाही तर त्याचे एक युट्यूब चॅनेल आहे. या माध्यमातून तो लोकांना फिटनेसचे सल्ले देतो. याशिवाय त्याचा मिनरल वॉटरचा बिझनेस आहे.