पाहा, ही तरूणी बनणार सनी देओलच्या मुलाची ‘हिरोईन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 16:15 IST2019-01-06T16:13:48+5:302019-01-06T16:15:14+5:30

सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. अखेर त्याचा शोध शिमल्याच्या सहर बंबा हिच्यापाशी येऊन थांबला.

saher bamba to star opposite karan deol in sunny deols pal pal dil ke pass | पाहा, ही तरूणी बनणार सनी देओलच्या मुलाची ‘हिरोईन’!

पाहा, ही तरूणी बनणार सनी देओलच्या मुलाची ‘हिरोईन’!

बॉलिवूडचे अनेक दिग्गज दिग्दर्शक व निर्मात्यांत बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सच्या मुलांना लॉन्च करण्याची शर्यत लागली असताना सनी देओलने मात्र स्वत:च्या मुलाला स्वत:च लॉन्च करण्याचा जिम्मा उचलला आहे. होय, ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून सनी आपला मुलगा करण देओल याला लॉन्च करतोय. २०१७ मध्येचं या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. अद्यापही ते सुरु आहे. याचे कारण म्हणजे, मुलाला लॉन्च करण्यात सनीला कुठलीही कसर सोडायची नाही.


या चित्रपटासाठी सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. अखेर त्याचा शोध शिमल्याच्या सहर बंबा हिच्यापाशी येऊन थांबला. सनीला करणसाठी जशी हवी होती, अगदी तशी हिरोईन मिळाली. सहर बंबा असे तिचे नाव आहे

.सहर शिमल्याची आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सहर टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती आहे व सध्या मुंबईत शिक्षण घेते आहे.एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे. आज सहरचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


सनी देओल दिग्दर्शन करणार असलेल्या करणच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे शीर्षक ठरल्यानंतरच गतवर्षी सनीने त्याचा टिझर सोशल मिडीयावर शेअर केला होता. यात करणची झलक दाखविली गेली होती. सनीच्या चाहत्यांचा आता त्याच्या मुलाच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. आता हा चित्रपट चाहत्यांना किती खूश करतो, ते तर बघूच. तोपर्यंत सहरचे हे फोटो आपण बघायलाचं हवे.

Web Title: saher bamba to star opposite karan deol in sunny deols pal pal dil ke pass