'सहाराश्री' तून उलगडणार सुब्रतो रॉय यांचा जीवनप्रवास, बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याचं नाव समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 10:43 AM2023-11-19T10:43:47+5:302023-11-19T10:46:06+5:30

सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या बायोपिकची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

sahara india pariwar late chairman Subrata Roy biopic saharashree on board Anil kapoor got an offer | 'सहाराश्री' तून उलगडणार सुब्रतो रॉय यांचा जीवनप्रवास, बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याचं नाव समोर

'सहाराश्री' तून उलगडणार सुब्रतो रॉय यांचा जीवनप्रवास, बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याचं नाव समोर

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती सहारा ग्रुपचे चेअरमन सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांचं मंगळवारी निधन झालं. ७५ वर्षीय सुब्रतो रॉय गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला. अनेक राजकीय नेत्यांपासून ते कलाकार रॉय यांच्या अंत्यदर्शनात सहभागी झाले. १० जून रोजी रॉय यांच्या वाढदिवशी फिल्ममेकर सुदिप्तो सेन यांनी त्यांच्या बायोपिकची घोषणा केली होती. तर या बायोपिकसाठी बॉलिवूडचा कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असेल  याबाबतही माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या बायोपिकची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याचवर्षी १० जून रोजी सुब्रतो रॉय यांनी ७५ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवशी निर्माते संदीप सिंह आणि जयंतीलाल गडा यांनी दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्यासोबत सहारा इंडियाचे संस्थापकांवर एक बायोपिक 'सहाराश्री' ची घोषणा केली होती. आता एका रिपोर्टनुसार या बायोपिकसाठी अनिल कपूरचं नाव समोर आलं आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. सुब्रतो रॉय यांच्या आयुष्यातील काही विवादांवर अनिल कपूरला आक्षेप आहे. मात्र सगळं सुरळीत झालं तर अनिल कपूरच 'सहाराश्री' मध्ये मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो आगामी Animal सिनेमात रणबीर  कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' या बहुचर्चित सिनेमातही त्याची भूमिका आहे. 

Web Title: sahara india pariwar late chairman Subrata Roy biopic saharashree on board Anil kapoor got an offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.