सागर पाटील कोण आहे? विमान अपघातात प्रेयसी गेली, रुग्णालयाच्या बाहेर हतबल अवस्थेत दिसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:58 IST2025-06-18T15:57:45+5:302025-06-18T15:58:06+5:30

एका तरुणानं आपल्या प्रेयसीला या दुर्घटनेत गमावलं.  त्या तरुणाचा रुग्णालयाबाहेरचा व्याकुळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Sagar Patil Model Singer Breaks Down After Air India Crash Girlfriend Manisha Thapa Air Hostes | सागर पाटील कोण आहे? विमान अपघातात प्रेयसी गेली, रुग्णालयाच्या बाहेर हतबल अवस्थेत दिसला!

सागर पाटील कोण आहे? विमान अपघातात प्रेयसी गेली, रुग्णालयाच्या बाहेर हतबल अवस्थेत दिसला!

Sagar Patil: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात शेकडो कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचं गमावलं. एका तरुणानं आपल्या प्रेयसीला या दुर्घटनेत गमावलं.  त्या तरुणाचा रुग्णालयाबाहेरचा व्याकुळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओनं सर्वांचं काळीज गलबलून गेलंय.

रुग्णालयाच्या बाहेर हतबल होऊन रडणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे सागर पाटील. त्याची गर्लफ्रेंड मनीषा थापा या फ्लाइटमध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होती. अपघाताची बातमी मिळाल्यानंतर सागर पाटील हा थेट मुंबईहून थेट अहमदाबादला पोहोचला होता. डीएनए टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये तो अत्यंत भावूक अवस्थेत दिसला. पत्रकाराने विचारल्यावर त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला "My Love...". प्रेयसीच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या सागरचा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावलेत. अनेकांनी सागरलाच्या त्याच्या इन्स्टावर मेसेज करत धीर देण्याचा प्रयत्न केलाय. 

सागरने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्वांचे आभार मानलेत. त्यानं लिहलं, "आपल्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. खूप सारे मेसेज येत आहेत, प्रत्येकीला उत्तर देणं शक्य नाही. मी काय बोलावं हेच समजत नाही. जे काही झालं त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवा...उद्या ते असतीलच याची खात्री नाही". सागर पाटील हा एक मॉडेल आणि सिंगर आहे. 

Web Title: Sagar Patil Model Singer Breaks Down After Air India Crash Girlfriend Manisha Thapa Air Hostes