सचिन पिळगावकरांसोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चा, बॉलिवूड अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली- "आता आमच्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:39 IST2026-01-11T16:37:05+5:302026-01-11T16:39:02+5:30
'नदियों के पार'मधील गुंजा-चंदनची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. या सिनेमानंतर सचिन पिळगावकर आणि साधना यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं होतं.

सचिन पिळगावकरांसोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चा, बॉलिवूड अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली- "आता आमच्यात..."
बॉलिवूड आणि सचिन पिळगावकर यांच्या कारकीर्दीतील अनेक एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक म्हणजे 'नदियों के पार' हा सिनेमा. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसही दणाणून सोडलं होतं. या सिनेमात सचिन पिळगावकर आणि साधना सिंग मुख्य भूमिकेत होते. 'नदियों के पार'मधील गुंजा-चंदनची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. या सिनेमानंतर सचिन पिळगावकर आणि साधना यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं होतं.
साधना सिंग म्हणाल्या होत्या, "'नदियों के पार' सिनेमाच्या शूटिंगआधी मी मुंबईत आले होते. तेव्हा मी ज्यांच्याकडे राहत होते तिथे सचिनजींच येणं जाणं होतं. तेव्हापासूनच आम्ही एकमेकांना ओळखत होतो. तेव्हा सचिनजी त्यांचा पहिला मराठी सिनेमा नवरी मिळे नवऱ्याला दिग्दर्शित करत होते. तो सिनेमाही आम्ही पाहिल्या. तेव्हाच आमच्यात मैत्री झाली होती. जेव्हा 'नदियों के पार' सिनेमाचं कास्टिंग फायनल झालं. तेव्हा माझा फोटो बघून सचिनजी म्हणाले की अरे हिला तर मी ओळखतो. पहिल्यापासूनच ओळखत असल्याने सचिनसोबत काम करण्यासाठी मी कंम्फर्टेबल होते. त्यानंतर आमची मैत्री खूप घट्ट झाली होती".
"आमची केमिस्ट्री खूप चांगली होती. तेव्हा मी अगोदरच एका रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे सचिनकडे मी कधीच त्या दृष्टीने पाहिलं नाही. त्यानंतरही काही सिनेमे आम्ही एकत्र केले. पण, 'नदियों के पार' सिनेमासारखा कोणताच सिनेमा चालला नाही. आमच्या दोघांचा सेन्स ऑफ ह्युमरही खूप छान होता. लग्नानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. पण, नंतर काय घडलं माहीत नाही पण आमच्या मैत्रीत अंतर आलं. आता आमच्यात पहिल्यासारखा बॉण्ड नाही", असं साधना म्हणाल्या.