​सबा कामरने मारला चांदनी चौकातील जिलेबीवर ताव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:45 IST2017-04-18T10:15:05+5:302017-04-18T15:45:05+5:30

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर लवकरच ‘हिंदी मीडियम’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. इरफान खानच्या पत्नीची भूमिका तिने यात साकारलीय. ...

Saba Kamar killed Chandni Chowk in jail! | ​सबा कामरने मारला चांदनी चौकातील जिलेबीवर ताव!

​सबा कामरने मारला चांदनी चौकातील जिलेबीवर ताव!

किस्तानी अभिनेत्री सबा कामर लवकरच ‘हिंदी मीडियम’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. इरफान खानच्या पत्नीची भूमिका तिने यात साकारलीय. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडे रिलीज झाला. यात सबा कमालीची सुंदर दिसतेय. भारतातील  चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  भाग घेऊ शकणार नसली तरी आपल्या या बॉलिवूड डेब्यूबद्दल सबा प्रचंड उत्सूक आहे. खरे तर ‘हिंदी मीडियम’चे शूटींग दिल्लीत होणार आहे, ही गोष्ट सबाला कळली तेव्हा ती प्रचंड आनंदी झाली होती. याचे कारण म्हणजे, सबाने दिल्लीतील चांदनी चौक भागाबद्दल खूप काही ऐकले होते. त्यामुळे जेव्हा सबा शूटींगसाठी दिल्लीत आली, तेव्हा  येथील चांदनी चौक भागात कधी एकदा जाते, असेच सबाला झाले होते. मला चांदनी चौक फिरायचाय, असे सांगून सांगून तिने चित्रपटाच्या अख्ख्या टीमला अक्षरश: भंडावून सोडले. विशेषत: चांदनी चौकातील जिलेबी आणि  येथील पराठेवाली गल्ली तिला खुणावत होती. अशात फार काळ प्रतीक्षा सहन होणारी नव्हतीच. मग सबाने सेटवरच जिलेबी मागवली आणि अख्ख्या क्रू मेंबर्ससोबत या जिलेबीवर मस्तपैकी ताव मारला. केवळ इतकेच नाही तर चांदनी चौकातील रंगीबेरंगी बांगड्याही तिने मागवल्या.

ALSO READ : watch !! एका ज्वलंत विषयाला वाहिलेल्या ‘हिंदी मीडियम’ चा ट्रेलर out !

 ‘हिंदी मीडियम’या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे.  इरफान आणि सबा  एका मुलीचे आई-वडिल असल्याचे यात दाखवले आहे. त्यांना एका बड्या शाळेत आपल्या मुलीचे अ‍ॅडमिशन करायचे असते. पण एका बड्या इंग्लिश मीडियम शाळेत अ‍ॅडमिशनसाठी काय काय दिव्यातून जावे लागते, हे या चित्रपटाचे कथानक आहे.   या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी याने केले आहे. यापूर्वी साकेतने विद्या बालन व फरहान अख्तर यांच्या भूमिका असलेल्या  ‘शादी के साईड इफेक्ट्स’  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 

Web Title: Saba Kamar killed Chandni Chowk in jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.