ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:03 IST2023-11-29T17:51:46+5:302023-11-29T18:03:45+5:30

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान हाश्मीने तो ऐश्वर्या रायचा खूप मोठा चाहता असल्याचा खुलासा केला. 

's vanity van Emraan Hashmi on Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का

ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमधील सीरिअल किसर म्हणून इम्रान हाश्मी ओळखला जातो. भलेही इमरानची ओळख सीरिअल किसर म्हणून झाली असली तरी त्याने मोठ्या पडद्यावर अनेक गंभीर भूमिका यशस्वीरित्या साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ या चित्रपटामध्ये तो नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ऐश्वर्या रायचा खूप मोठा चाहता असल्याचा खुलासा केला. 

कनेक्ट एफएम कॅनडाशी बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला की, 'मी ऐश्वर्या रायचा मोठा चाहता आहे. एकदा मी ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर किमान दीड तास तिची एक झलक पाहण्यासाठी थांबलो होतो. त्यावेळी मी माझा चुलत भाऊ मोहित सुरी सोबत असिस्टंट डायरेक्टर होतो आणि तो सुद्धा असिस्टंट होता'.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या रायबद्दल कमेंट केली होती. त्यांनी अभिनेत्रीला 'प्लास्टिक' म्हटले होते. या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. आता यावर प्रतिक्रिया देताना इम्रान म्हणाला, 'मला असे म्हणायचे नव्हते. मी ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे'. 

इम्रान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, इम्रान हाश्मीने  'मर्डर', 'जेहर', 'आशिक बनाया आपने', 'अक्सर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि 'गँगस्टर' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तर ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता. तर अलीकडेच 'टायगर ३’ चित्रपटात इम्रान खलनायकाच्या भूमिकेत पाहयाल मिळाला.
 

Web Title: 's vanity van Emraan Hashmi on Aishwarya Rai Bachchan