RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 12:42 IST2021-12-09T12:41:13+5:302021-12-09T12:42:20+5:30

RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त  Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे.

RRR Trailer Release : Junior NTR, Ram Charan and Alia Bhatt starrer action movie RRR trailer released | RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही महिन्यांपासून सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर (NTR), राम चरण (Ram Charan), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या RRR सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. आता या धमाकेदार सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त  Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे.

सिनेमाच्या ट्रेलरवरून समजतं की, ज्यूनिअर एनटीआर एका क्रांतिकारच्या भूमिकेत दिसणार आहे. याच क्रांतिकारकाला पकडण्यासाठी एका ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं जातं. ही भूमिका राम चरण साकारत आहे. मात्र, नंतर दोघेही इंग्रजांविरोधात बंड पुकारतात. आणि मग सुरू होतो Action ने भरपूर महायुद्ध. 

ट्रेलर बघून लक्षात येतं की आलिया आणि अजयच्या या सिनेमातील भूमिका लहान आहेत पण प्रभावशाली आहे. एसएस राजमौली यांनी RRR या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून बाहुबलीची कथा लिहिणाऱ्या वी. विजयेंद्र प्रसाद यांनीच याही सिनेमाची कथा लिहिली आहे. तर एमएम करीमने या सिनेमाला संगीत दिलं आहे. हा सिनेमा येत्या ७ जानेवारी २०२२ मध्ये हिंदीसहीत तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
 

Web Title: RRR Trailer Release : Junior NTR, Ram Charan and Alia Bhatt starrer action movie RRR trailer released