Romantic Couples : या लिजेंड स्टार्सची लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 20:32 IST2017-02-14T14:56:49+5:302017-02-14T20:32:20+5:30

बॉलिवूडमध्ये प्रेम अन् ब्रेकअप होणे काही नवीन नाही. नेहमी एकत्र दिसणारी जोडपी कधी वेगळी होतील, हे सांगणे खरोखरच अवघड ...

Romantic Couples: Do You Know This Legend Star's Love Story? | Romantic Couples : या लिजेंड स्टार्सची लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का?

Romantic Couples : या लिजेंड स्टार्सची लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का?

लिवूडमध्ये प्रेम अन् ब्रेकअप होणे काही नवीन नाही. नेहमी एकत्र दिसणारी जोडपी कधी वेगळी होतील, हे सांगणे खरोखरच अवघड झाले आहे. आता तर बारा-पंधरा वर्ष एकत्र संसार केलेले सेलिब्रेटीही घटस्फोट घेत आहेत. मात्र काही कपल्स असे आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रेमाचा एकप्रकारे आदर्शच निर्माण केला आहे. हे कपल एकमेकांच्या प्रेमात पडले अन् जणूकाही त्यांनी जन्मोजन्मी एकत्र राहण्याचे एकमेकांना वचन दिले. त्यांच्या लव्ह स्टोरीही हटके आहेत. रिल लाइफमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकणारी ही मंडळी रिअल लाइफमध्येही इतरांसाठी प्रेरणादायी आहे. कारण या कपल्सने त्यांच्यातील असलेले प्रेम जगासमोर सिद्ध केले आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त या कपल्सच्या प्रेमकथा खास ‘सीएनएक्स मस्ती’च्या वाचकांसाठी...



अमिताभ बच्चन-जय बच्चन
महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना बॉलिवूडचे गोल्डन कपल असे म्हटले जाते. कारण त्यांच्यातील प्रेम हे काळानुरूप अधिक घट्ट होत असताना दिसत आहे. एक आयडियल व्यक्तिमत्त्वाचे टॉल, डार्क आणि हॅण्डसम लूक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी अतिशय सुंदर आणि डिसेंट लूक असलेल्या जया बच्चन यांच्याशी ३ जून १९७३ रोजी विवाह केला. जेव्हा त्यांचा विवाह झाला त्यावेळेस जया बच्चन बॉलिवूडमधील एक स्थिर कलाकार होती. तर अमिताभ बच्चन हे सुपरस्टारच्या वाटेवर होते. अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आलेत. परंतु जया नेहमीच त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. मध्यंतरीच्या काळात अभिनेत्री रेखासोबत अमिताभचे अनेक किस्से ऐकावयास मिळालेत, परंतु जयासोबतच्या संबंधांवर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. आज ते चार दशकांपेक्षा अधिक काळापासून एकत्र संसार करीत आहेत. मात्र कधीही त्यांच्यात कटुता निर्माण होत असल्याचे बघावयास मिळाले नाही. उलट जसजसे दिवस जात आहेत, तसे त्यांच्यातील प्रेमसंबंध अधिकच घट्ट होत आहेत. अशा या गोल्डन कपलने नुकताच लग्नाचा ४२ वा वाढदिवस साजरा केला असून, महानायक बिग बीने जयासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत फॅन्सचे आभार मानले होते. 



दिलीप कुमार-सायरा बानो

सुपरस्टार दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या वयात तब्बल २२ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्या काळात व आताही त्यांच्या सदाबहार लव्हस्टोरीमध्ये वयामुळे कधीही दुरावा आला नाही. सायरा बानो त्याकाळात किंग आॅफ ट्रेजेडी समजल्या जाणाºया दिलीप कुमारची जबरदस्त फॅन होती. त्यामुळे दिलीप कुमारसोबत लग्नाची तिने कधीही विचार केला नव्हता. मात्र अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली अन् १९६६ मध्ये दोघेही विवाहाच्या बंधनात अडकले. त्यावेळेस सायराचे वय २२ वर्ष इतके होते. त्यावेळी सायरा बानो दिलीप कुमार यांना प्रत्येक अडचणीत त्यांना सपोर्ट करताना बघावयास मिळाली. जेव्हा दिलीप कुमार यांची पहली पत्नी पाकिस्तानातून त्यांच्यावर नको ते आरोप करीत होती, तेव्हा सायरानेच दिलीप कुमार यांना आश्वस्त करत धीर दिला होता. आजही या दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेले दिसत नाही. वयाच्या या वळणावरदेखील जेव्हा-केव्हा हे दोघे माध्यमांसमोर येता तेव्हा ते एकमेकांचा हातात हात घेऊन बघावयास मिळतात. 



धर्मेंद्र- हेमा मालिनी

बॉलिवूडचा हि-मॅन अशी ओळख असलेला अभिनेता धर्मेंद्र अगोदरच विवाहित होता. परंतु ड्रिम गर्ल हेमा मालिनी हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. सुरुवातीला हेमा मालिनी हिचा काहीसा नकारात्मक सूर होता. कारण तिला विवाहित पुरुषांशी लग्न करायचे नव्हते. परंतु ‘शोले’ या सिनेमाच्या सेटवर या दोघांची मने अशी काही जुळलीत की ते एकमेकांच्या प्रेमात पडले अन् जन्माजन्मी एकत्र जीवन जगण्याचे त्यांनी एकमेकांना वचनही दिले. मात्र एवढ्या सहजासहजी त्यांच्या लग्नाचा मार्ग सुकर होणार नव्हता. धर्मेंद्र याची पहिली पत्नी प्रकाश कौर हिने त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला. दुसरीकडे हेमा मालिनीचे जितेंद्रसोबतच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे हेमा मालिनी आणि जितेंद्र यांनी लग्न केल्याचेही बोलले गेले. मात्र धर्मेंद्रने या सर्व चर्चांना अफवा मानले. पुढे शीख धर्मातून मुस्लीम धर्म स्वीकारत हेमा मालिनीशी लग्न करण्याची पूर्ण तयारीही दर्शविली. पुढे १९७९ मध्ये दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांना इशा आणि आहना या दोन मुली आहेत.



ऋषी कपूर-नीतू कपूर
बॉलिवूडचा ओरिजिनल लव्हरबॉय ऋषी कपूर आणि त्याची कोस्टार नीतू कपूर एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळेस दोघांचेही सिनेमे बॉक्स आॅफिसवर जबरदस्त हिट ठरत होते. शिवाय यंग जनरेशनमध्ये दोघेही जबरदस्त पॉप्युलर होते. जेव्हा नीतू कपूरने जेव्हा ऋषी कपूरशी विवाह केला तेव्हा तिचे वय केवळ २१ वर्ष इतके होते. लग्नानंतर दोघांनीही इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे ठरविले. त्यावेळेस अशीही चर्चा रंगली होती की, दोघांवर बॉलिवूडपासून दूर राहण्यासाठी दबाव टाकला जात आहे. परंतू नीतू कपूरने त्यावेळेस क्लिअर केले होते की, त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसून ती त्यांची पर्सनल चॉइस आहे. बºयाच काळातनंतर नीतू कपूरने ‘लव्ह आजकल, दो दूनी चार आणि जब तक हैं जान’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या दोघांना रणबीर आणि रिधिमा नावाची दोन मुले आहेत. रणबीर कपूरने तर आपल्या अभिनयाच्या आधारावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Romantic Couples: Do You Know This Legend Star's Love Story?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.