रोहित शेट्टीच्या 'गोलमाल4' मध्ये असणार 'हे' स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:45 IST2017-03-14T08:53:17+5:302017-03-15T12:45:09+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून गोलमाल 4च्या स्टारकास्टबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आज संपली आहे.  याआधीच्या गोलमालमध्ये अजय देवगन, तुषार ...

Rohit Shetty's 'Golmaal 4' will have 'O' stars | रोहित शेट्टीच्या 'गोलमाल4' मध्ये असणार 'हे' स्टार्स

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल4' मध्ये असणार 'हे' स्टार्स

ल्या अनेक दिवसांपासून गोलमाल 4च्या स्टारकास्टबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आज संपली आहे.  याआधीच्या गोलमालमध्ये अजय देवगन, तुषार कपूर, श्रेयस तळपदे. अर्शद वारसी आणि कुणाल खेमू आपल्याला दिसले आहेत. यावेळी गोलमाल 4मध्ये आपल्याला दोन नवे चेहरे दिसणार आहेत. तब्बू आणि परिणीची चोप्रा गोलमाल 4मध्ये असणार आहेत. 

रोहित शेट्टीने गोलमाल 4 च्या टीमसोबतचे काही फोटो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.  गोलमाल सीरीजमधला पहिला चित्रपट गोलमाल 2006मध्ये आला होता.  त्यानंतर 2-2 वर्षांच्या अंतरानंतर 2008गोलमाल रिटर्न्स  आणि 2010मध्ये गोलमाल 3 आला होता. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनंतर रोहित शेट्टी गोलमाल 4 हा चित्रपट घेऊन येतो आहे.  नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार असल्याचे समजतेय. याही चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. याआधीच्या गोलमालमध्ये करिना कपूर आणि अमृता अरोरा आपल्याला दिसल्या होत्या. यावेळी त्यांची जागा तब्बू आणि परिणीती चोप्रानी घेतली आहे. गोलमाल 4 ची रोहित शेट्टीचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. आधी गोलमाल सीरीजमधले सगळे चित्रपट सुपरहिट ठरले आहे. अजय देवगन अर्शद, तुषार यांची केमिस्ट्री चांगलीच हिट ठरला आहे. त्यामुळे गोलमाल 4 मध्ये आता काय नवीन रोहित शेट्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांच आहे.  

Web Title: Rohit Shetty's 'Golmaal 4' will have 'O' stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.