'हा एक जबरदस्त प्रवास होता', रणवीर सिंगसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला रोहित शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:56 IST2021-03-29T14:44:21+5:302021-03-29T14:56:39+5:30
रणवीर सिंगसोबत एक फोटो रोहित शेट्टीने शेअर केला आहे.

'हा एक जबरदस्त प्रवास होता', रणवीर सिंगसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला रोहित शेट्टी
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेला रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सर्कस’ची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहे. रोहित शेट्टीने एक फोटो शेअर करत शेअर करत लवकरच त्याच्या चित्रपटाचे शूटिंग संपणार असल्याचे सांगितले आहे. रणवीर सिंगसोबत एक मस्त फोटो शेअर करताना रोहित शेट्टीने ही माहिती दिली आहे.
हा फोटो शेअर करताना रोहित शेट्टीने लिहिले की, 'हा एक जबरदस्त प्रवास होता. आणि आता...याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आम्ही सर्कसच्या शेवटच्या शेड्युलकडे वाटचाल करत आहोत. या फोटोसाठी रणवीर सिंहने लिहिले, 'सिनेमासाठी प्रेम.' त्याचबरोबर वरुण शर्मा आणि पूजा हेगडे यांनी हार्ट आणि फायरचे इमोजी शेअर करत पसंती दर्शविली आहे.
सर्कस’ या नावावरून एक अंदाज तुम्हाला आला असेलच की, हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस व वरूण शर्मा दिसणार आहेत. कॉपीराईटच्या भीतीने रोहितने या सिनेमाचे नाव बदलले असे मध्यंतरी चर्चा होती. त्याआधी रणवीर सिंग व रोहित शेट्टी मिळून ‘अंगूर’ नामक सिनेमा बनवणार असल्याची चर्चा होती. हा सिनेमा संजीव कुमारच्या ‘अंगूर’ या सिनेमाचा रिमेक असल्याचा दावाही केला गेला होता. रणवीर यात डबलरोलमध्ये दिसणार, अशीही चर्चा होती. आता मात्र या सिनेमाचे नाव ‘अंगूर’ नाही तर ‘सर्कस’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित शेट्टीने कॉपीराईटच्या वादाला घाबरून नाव बदलल्याचे मानले जाते.