‘हे’ भन्नाट मीम्स पाहून खुद्द रोहित शेट्टीला आवरले नाही हसू; 'कॉप युनिव्हर्स'वर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 12:53 PM2023-10-22T12:53:06+5:302023-10-22T13:03:19+5:30

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सबद्दल चाहत्यांनी भन्नाट मीम्स बनवले आहे.

Rohit Shetty reacts to a meme about his Cop Universe | ‘हे’ भन्नाट मीम्स पाहून खुद्द रोहित शेट्टीला आवरले नाही हसू; 'कॉप युनिव्हर्स'वर नेटकरी फिदा

‘हे’ भन्नाट मीम्स पाहून खुद्द रोहित शेट्टीला आवरले नाही हसू; 'कॉप युनिव्हर्स'वर नेटकरी फिदा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या चित्रपटामुळे कायम चर्चेत असतो.  रोहित शेट्टीचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स उत्सुकतेने वाट बघत असतात. 'गोलमाल' चित्रपटातून विनोदी दुनियेत आणि 'सिंघम', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या कॉप युनिव्हर्सद्वारे अ‍ॅक्शनच्या दुनियेत आपण किंग असल्याचे त्यानं सिद्ध केलं आहे.

 'सिंघम अगेन' चित्रपटानंतर रोहित शेट्टीची 'इंडियन पोलिस फोर्स' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रोहितच्या  'कॉप युनिव्हर्स'वर नेटकरी फिदा झाल्याचं दिसून आलं आहे. चाहत्यांनी आता रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सबद्दल भन्नाट मीम्स बनवले आहेत. हे मीम्स पाहून खुद्द रोहित शेट्टी आपले हसू आवरू शकला नाही. त्यापैकी एक मीम्स स्वतः रोहितने शेअर केलं आहे.

रोहित शेट्टी आपल्या चित्रपटांमध्ये प्रत्येक अभिनेत्याला पोलिस अधिकारी बनवत आहे. सिंघम अगेनममध्ये दीपिकानंतर टायगरचीही एन्ट्री झाली. त्यानंतर आता "इंडियन पोलिस फोर्स" मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि विवेक ओबेरॉय हे तीन प्रमुख कलाकार पोलिसांच्या भुमिकेत आहेत. यावर एका युजरने एक मजेशीर मीम्स बनवलं आहे.

 मीममध्ये रोहित शेट्टी एका मुलाच्या रुपात दाखवला असून तो म्हणतो, "तू पोलिसमध्ये", "तू पण पुलिसात", "तू पण", "तुझ्या पाठीमागचा पण", "तू वेब सीरीजमध्ये पोलिस". हे मीमने रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आणि कप्शनमध्ये लिहलं, "आता हे कोणी तयार केले???". यासोबतच त्याने हसणारे एमोजी जोडले आहेत. 


एका रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीकडे आगामी चित्रपटासाठी सहा लेखकांची टीम आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशा पद्धतीने चित्रपटाची कथा या टीमद्वारे लिहली जात. तर 'सिंघम 3' हा रोहित शेट्टीच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे.  'सिंघम अगेन' मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर  'इंडियन पोलिस फोर्स' ही वेब सीरिज पुढील वर्षी 19 जानेवारी रोजी 'अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Rohit Shetty reacts to a meme about his Cop Universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.