"अपना टाइम आयेगा...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर रोहित शेट्टीची पोस्ट, म्हणाला- "अक्षय खन्नाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:13 IST2025-12-12T13:12:44+5:302025-12-12T13:13:56+5:30
'धुरंधर' पाहिल्यानंतर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीही थक्क झाला आहे. रोहितने सिनेमासाठी खास पोस्ट लिहित रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे.

"अपना टाइम आयेगा...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर रोहित शेट्टीची पोस्ट, म्हणाला- "अक्षय खन्नाला..."
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर' सिनेमाचीच चर्चा होताना दिसत आहे. सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. 'धुरंधर' पाहिल्यानंतर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीही थक्क झाला आहे. रोहितने सिनेमासाठी खास पोस्ट लिहित रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे.
रोहितने इन्स्टाग्रामवर 'धुरंधर'चं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, "आदित्य धर आणि टीम तुमचं खूप कौतुक... तू मॉनस्टर सिनेमा बनवला आहेस. रणवीर माझ्या भावा 'अपना टाइम आयेगा'... अक्षय खन्नाला इतक्या वर्षांपासून जे प्रेम आणि आदर मिळायला हवा होता, तो आता मिळतोय हे पाहून छान वाटतंय. आदित्य मला अजूनही आठवतंय उरी सिनेमा रिलीज व्हायच्या आदल्या रात्री आपण सगळे मिळून तो सिनेमा पाहत होतो. उरीपासून ते धुरंधरपर्यंत एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तुझा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. हा नवा हिंदी सिनेमा आहे आता हा घुसून मारणार...१९ मार्चची वाट पाहतोय".
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, सारा अर्जन, अर्जुन रामपाल अशी 'धुरंधर'ची स्टारकास्ट आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं आहे. ५ डिसेंबरला 'धुरंधर' प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत या सिनेमाने २०७ कोटींचा गल्ला जमवला आहे.