रोहित शेट्टीनं मुंबईच्या रस्त्यावर चालवली महागडी गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:41 IST2026-01-29T12:40:54+5:302026-01-29T12:41:58+5:30

रोहित शेट्टीला महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक आहे.

Rohit Shetty GMC Hummer EV Worth Rs 4.57 Crore | रोहित शेट्टीनं मुंबईच्या रस्त्यावर चालवली महागडी गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल, व्हिडीओ व्हायरल

रोहित शेट्टीनं मुंबईच्या रस्त्यावर चालवली महागडी गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमधील उडणाऱ्या कार्ससाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो खऱ्या आयुष्यातील लक्झरी कार कलेक्शनसाठीही चर्चेत असतो. अलिकडेच रोहित शेट्टी एका अत्यंत आलिशान जीएमसी हमर ईव्ही (GMC Hummer EV) चालवताना दिसला. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत तब्बल ४.५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

इंस्टाग्रामवर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी स्वतः ही भव्य 'सोलर ऑरेंज' रंगाची हमर ईव्ही चालवताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पोलीस स्टिकर असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ दिसते आणि त्यानंतर रोहित शेट्टीची ही  एसयूव्ही एन्ट्री घेते. रोहित शेट्टीने ही गाडी विकत घेतली आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. उपलब्ध माहितीनुसार, ही गाडी सध्या 'बिग बॉय टॉयझ' या प्रीमियम कार डीलरशिपच्या नावावर नोंदणीकृत आहे.

रोहित शेट्टी चालवत असलेली हमर ईव्ही ही साधीसुधी कार नाही. ही एसयूव्ही ३X व्हेरिएंट असून ड्युअल अल्टीयम मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपसह येते. ४,५०० किलो वजन असूनही, ही कार अवघ्या ३.५ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग पकडू शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही गाडी ५०५ किमी पर्यंत धावू शकते. इतर वाहनांच्या तुलनेत ही गाडी आकाराने खूप मोठी आणि भव्य दिसते.


रोहित शेट्टीचे आलिशान गॅरेज
रोहित शेट्टीकडे आधीच अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. मर्सिडीज-बेंझ G63 AMG या गाडीची किंमत सुमारे ४.५ कोटी रुपये आहे. सुपरफास्ट वेग आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध असलेली   लॅम्बोर्गिनी उरुस ही एसयूव्ही रोहितच्या ताफ्यात आहे.  त्याच्या अनेक चित्रपटांची ओळख असलेली महिंद्रा स्कॉर्पिओदेखील त्याच्या कलेक्शनमध्ये आहे.

Web Title : रोहित शेट्टी ने मुंबई में चलाई लग्जरी कार; कीमत सुनकर दर्शक दंग।

Web Summary : निर्देशक रोहित शेट्टी को मुंबई में जीएमसी हमर ईवी चलाते हुए देखा गया, जिसकी कीमत ₹4.5 करोड़ बताई जा रही है। स्वामित्व की पुष्टि नहीं हुई है, लेकिन इलेक्ट्रिक एसयूवी प्रभावशाली गति का दावा करती है, 3.5 सेकंड में 0 से 100 किमी/घंटा की रफ्तार पकड़ती है और एक बार चार्ज करने पर 505 किमी तक चलती है। शेट्टी के पास पहले से ही कई लग्जरी कारें हैं।

Web Title : Rohit Shetty drives luxury car in Mumbai; price shocks viewers.

Web Summary : Director Rohit Shetty spotted driving a GMC Hummer EV in Mumbai, reportedly costing ₹4.5 crore. While ownership is unconfirmed, the electric SUV boasts impressive speed, accelerating from 0 to 100 km/h in 3.5 seconds and traveling 505 km on a full charge. Shetty already owns multiple luxury cars.