Video: "नाराज दिसतोय..."; रोबोटने सलमानशी हात मिळवला नाही; अधिकारी गोंधळला, पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:15 IST2026-01-31T12:12:01+5:302026-01-31T12:15:18+5:30
नुकतंच सलमान ISPL इव्हेंटमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे असलेल्या एका रोबोटजवळ सलमान उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. पुढे काय घडलं?

Video: "नाराज दिसतोय..."; रोबोटने सलमानशी हात मिळवला नाही; अधिकारी गोंधळला, पुढे काय घडलं?
सलमान खान हा त्याच्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. सलमान सध्या सिनेमांच्या शूटिंगसोबत अनेक जाहीर इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसतो. सलमानचं फॅन फॉलोईंग इतकं आहे की त्याला विविध ठिकाणांहून आमंत्रण येत असतात. अशातच नुकतंच सलमान ISPL इव्हेंटमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे असलेल्या एका रोबोटजवळ सलमान उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. पुढे काय घडलं?
सलमानसोबत रोबोटने हात मिळवला नाही, पुढे...
ISPL लीगच्या कार्यक्रमात सलमान उपस्थित होतो. सलमानची टीमसुद्धा ISPL मध्ये सहभागी आहे. अशातच तिथल्या कार्यक्रमात सलमान अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करत होता. सर्वांना भेटत असताना सलमान अचानक एका रोबोटसमोर उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. ''नाराज दिसतोय वाटतं...''; अशी सलमानने मजेशीर टिप्पणी केली. परंतु यामुळे रोबोटला सांभाळणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
सलमान तिथून जायला निघत होता तेव्हा अचानक रोबोटने हात पुढे केला. त्यामुळे सलमानने त्याच्याशी हात मिळवला. या प्रसंगामुळे सलमानच्या चेहऱ्यावर हसू आलं. रोबोटच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यानेही सुटकेचा श्वास सोडला. आजूबाजूचे सर्वजणही हसायला लागले. अशाप्रकारे हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात झळकणार असून हा सिनेमा एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.