रितेश देशमुखच्या मागेपुढे करत होता रोबोट, मग अभिनेत्याने केलं असं काही...; AI फिल्म फेस्टिव्हलमधील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:23 IST2025-11-03T12:22:30+5:302025-11-03T12:23:44+5:30
रितेशचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. रितेश देशमुखही AI फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित होता.

रितेश देशमुखच्या मागेपुढे करत होता रोबोट, मग अभिनेत्याने केलं असं काही...; AI फिल्म फेस्टिव्हलमधील व्हिडीओ व्हायरल
रितेश देशमुख हा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आहे. घरात राजकीय वातावरण असलेल्या रितेशने अभिनयाची वाट पकडली. बॉलिवूडमधून अभिनयात पदार्पण केलेला रितेश मराठी सिनेसृष्टीही गाजवत आहे. रितेशचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्याच्या अभिनयावर आणि देशमुख कुटुंबीयांवरही चाहते मनापासून प्रेम करतात. रितेशचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.
नुकतंच मुंबईत AI फिल्म फेस्टिव्हल पार पडलं. या AI फिल्म फेस्टिव्हलला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रितेश देशमुखही या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित होता. AI फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक रोबोट येणाऱ्या पाहुण्यांचं आणि सेलिब्रिटींचं स्वागत करत होता. रितेश देशमुखने एन्ट्री घेतल्यावर या रोबोटने त्याचं स्वागत केलं. त्यानंतर तो रोबोट रितेशच्या मागेपुढे करत होता. मग रितेशने त्या रोबोटला शेकहँडही केला. AI फिल्म फेस्टिव्हलमधील रितेशचा हा व्हिडीओ स्पॉटबॉय डॉट इन या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, रितेश देशमुख 'मस्ती ४' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ नोव्हेंबरला रितेशचा हा नवा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी २०२५मध्ये रितेशचे हाऊसफूल ५ आणि रेड २ हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. तर नववर्षातील रितेशच्या 'राजा शिवाजी' आणि 'धमाल ४' या सिनेमांच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत.